आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fastest Railway's Test In Japan, Broke Its Own Record

जगातील सर्वांत वेगवान रेल्वेची चाचणी, वेग ताशी ६०३ किमी, स्वत:चाच विक्रम मोडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो -जपानची मॅग्लेव्ह रेल्वे मंगळवारी ताशी ६०३ किमी या वेगाने धावण्यात यशस्वी ठरली. जगातील कुठल्याही रेल्वेचा हा सर्वाधिक वेग आहे. चाचणीदरम्यान जवळपास ११ सेकंदांपर्यंत मॅग्लेव्हचा वेग ६०० किमीपेक्षा जास्त होता. माउंट फिजी भागात ही चाचणी करण्यात आली. गेल्या गुरुवारीच या रेल्वेने ताशी ५९० किमी या वेगाचा विक्रम नोंदवला होता. तिचा सरासरी वेग ताशी ४०० किलोमीटरपर्यंत असतो.
या वेगाचा अर्थ काय?
- 1236 किमी/ताशी आहे आवाजाचा वेग म्हणजे मॅग्लेव्हचा वेग त्याच्या अर्ध्यापर्यंत पोहोचला.
- 905 किमी/तास असतो बोइंग विमानाचा वेग मॅग्लेव्हने त्याच्या दोन तृतीयांश वेग गाठला आहे.
जर भारतात आली तर...
- 2.20 तासांत मुंबई ते दिल्ली राजधानी ट्रेनला हे अंतर कापण्यास १६ तास लागतात.
- 6.15 तासांत जम्मू ते कन्याकुमारी : हिमसागर एक्स्प्रेसला ७० तास लागतात.

रुळांच्याही १० सेमी वर धावते मॅग्लेव्ह
ही रेल्वे ‘मॅग्नेटिक लेव्हिटेशन’ने धावते. त्यामुळे तिला मॅग्लेव्ह रेल्वे म्हणतात. ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक सस्पेन्शनवर काम करते. इंजिन नसते. त्याजागी नियंत्रण यंत्रणा असते. रेल्वे चुंबकीय ऊर्जेच्या आधारे रुळांपासून १० सेंमी वर धावते. घर्षण होत नसल्याने वेग वाढतो.
चाचणी १२ वर्षांनंतरच्या प्रकल्पासाठी : टोकियो व नगोया या दोन जपानी शहरांदरम्यान २०२७ मध्ये मॅग्लेव्ह रेल्वे धावेल. त्यासाठी चाचणी घेतली. टोकियो ते नगोया २८० किमी आहे. रेल्वे हे अंतर ४० मिनिटांत पूर्ण करेल. २०४५ पर्यंत टोकियो-ओसाकादरम्यानही ही रेल्वे धावेल.