आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ मस्‍ती म्‍हणून पित्‍याने घेतला चिमुकल्‍याचा जीव, आई पाहात होती तमाशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केवळ मस्‍ती म्‍हणून मुलाला छळायचा हा व्‍यक्‍ती. - Divya Marathi
केवळ मस्‍ती म्‍हणून मुलाला छळायचा हा व्‍यक्‍ती.
मिसौरीमधील संत लुइस येथील ग्‍लेलोन चिल्‍ड्रन हॉस्पिटलमध्‍ये नोव्‍हेबंर 2016 रोजी 9 आठवड्यांच्‍या चिमुकल्‍याचा मृत्‍यू झाला होता. या चिमुकल्‍याचे नाव जॅक्‍सन असे होते. त्‍याच्‍या मृत्‍यूला असे लोक जबाबदार आहेत ज्‍यांचे काम त्याच्‍यावर प्रेम करण्‍याचे होते. 
 
पिता करायचा अघोरी छळ 
- 20 वर्षीय रॉबर्ट जेम्‍स बर्नेट आणि 21 वर्षीय मेगन एल हैंर्डिक्‍स  आपल्‍या मुलाच्‍याच मृत्‍यूप्रकरणी सध्‍या तुरुंगात आहेत. 
- लहानग्‍या जॅक्‍सनचा मृत्‍यू इंटरनल ब्‍लीडींग आणि हाडे मोडल्‍याने झाल्‍याचे तपासात निष्‍पन्‍न झाले आहे. त्‍याच्‍या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्‍या आहेत. 
- जॅक्‍सनचे वडील रॉबर्ट त्‍याच्‍याशी अत्‍यंक क्रूरपणे वागायचे असे समोर आले आहे. जॅक्‍सनला झाडावरुन फेकून देणे आणि हवेत वर फेकून नंतर त्‍याला सोडून देणे, अशा प्रकारची चिड आणणारी कृत्‍ये हा पिता आपल्‍या पाल्‍यासोबत करत असे. विशेष म्‍हणजे हे सर्व तो जॅक्‍सनची आई मेगन समोर करायचा तरीदेखील याबाबत रॉबर्टला काहीही म्‍हणत नसे. 
- एकेदिवशी त्‍याने जॅक्‍सनला पलंगावरुन खाली फेकले. यामुळे त्‍याला अत्‍यंत गंभीर जखमा झाल्‍या. रुग्‍णालयात दाखल केल्‍यानंतर डॉक्‍टरांनी ताबडतोब या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी प्रथम रॉबर्ट आणि मेगनवर मुलावर शारीरीक अत्‍याचार केल्‍याप्रकरणी गुन्‍हा दाखल केला होता. मात्र उपचारादरम्‍यानच जॅकसनची ज्‍योत मालवली. यामुळे दोघा पालकांवर मुलाच्‍या मृत्‍यूचा गुन्‍हा दाखल करणयात आला. 
 
आता तरुंगात भोगत आहे शिक्षा 
- कोर्टात याप्रकरणी सुनावणी चालु असताना अनेक धक्‍कादायक गोष्‍टी समोर आल्‍या आहेत. रॉबर्ट केवळ क्रूर आनंदासाठी स्‍वत:च्‍या मुलाचा असा छळ करायचा, असे समोर आले आहे. 
- जेव्‍हा जॅक्‍सन रडायचा तेव्‍हा रॉबर्ट त्‍याच्‍या तोंडात बोटे घालून त्‍याला गप्‍प करायचा. 
- आता हे दोन्‍हीही पालक तुरुंगात आपल्‍या शिक्षेची वाट पाहात आहेत. दोघांनाही आजन्‍म कारावासाची शिक्षा होण्‍याची शक्‍यता आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, कसे करायचे मुलाला टॉर्चर... 

 
बातम्या आणखी आहेत...