आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्त्रायलमधील पित्याचे क्रूर कृत्य, लहानगीला केले बादलीत बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येरुशेलम - इस्त्रायलमधील एका व्यक्तीला त्याच्या मुलीला बादलीत बंद केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. स्वतःच्या मुलीसोबत केलेल्या या क्रुर कृत्याचा व्हिडिओ देखिल समोर आला आहे. ही घटना इस्त्रायलमधील अबू गोश शहरातील आहे.

इस्त्रायल नेशन न्यूजने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात आरोपी, 'मी या मुलीला खूप वैतागलो आहे, हिला कसायाकडेच देतो आता.' असे म्हणताना आढळतो. मात्र अटकेनंतर त्याने सांगितले, 'मी फक्त मुलीला घाबरवत होतो. माझा तसा कोणताही उद्देश नव्हता.' व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपीची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

काय आहे व्हिडिओमध्ये
यात एक व्यक्ती आपल्या मुलीला प्लास्टिकच्या बादलीत बसवतो. त्यानंतर मुलीचे डोके वरुन दाबून वरुन झाकण बंद केले. त्यानंतर पिता बादलीत बंद केलेल्या मुलीला घेऊन निघतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...