आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबान समर्थक आहे हल्लेखोराचे वडील, TV शोमध्ये उडवायचे PAK ची खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्दीक मतीनने तीन वर्षांपूर्वी 'पायम-ए-अफगाण दुरंद जिगरा' हा टीव्ही शो होस्ट केला होता. - Divya Marathi
सिद्दीक मतीनने तीन वर्षांपूर्वी 'पायम-ए-अफगाण दुरंद जिगरा' हा टीव्ही शो होस्ट केला होता.
वॉशिंग्टन - अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतात ऑरलँडो शहरात एलजीबीटी (समलैंगिक) नाइट क्लबवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा पिता सिद्दीक मतीन तालिबानचा पाठिराखा आहे. सिद्दीकने पाकिस्तान, आयएसआय आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असरफ गनी यांच्याविरोधात यापूर्वी गरळ ओकली होती. सिद्दीकने अफगाणिस्थानमधील एका अमेरिकी चॅनलच्या पॉलिटिकल शोचे अँकरिंग देखील केले आहे. तो त्याच्या शोमध्ये अफगाण तालिबानचे मोठे कौतूक करायचा.

- सिद्दीकने 2015 मध्ये अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याचीही घोषणा केली होती. वास्तविक तेव्हा तिथे कोणतीच निवडणूक नव्हती.
- सिद्दीक मतीनने तीन वर्षांपूर्वी 'पायम-ए-अफगाण दुरंद जिगरा' हा टीव्ही शो होस्ट केला होता.
- पायम-ए-अफगाण या चॅनलचे कॅलिफोर्निया येथून प्रक्षेपण होते.
- शो दरम्यान सिद्दीक अनेकदा पाकिस्तानची टिंगल-टवाळी करत होता आणि तालिबानला पाठिंबा दर्शवत असायचा.
- एप्रिलमध्ये त्याने वॉशिंग्टन डीसीचा दौरा केला होता, तेव्हा त्याने अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.
- अफगाणचा रहिवासी सिद्दीक मतीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना नियमीत पत्र पाठवत होता.

गे कपलला पाहून संतप्त होत होता हल्लेखोर
- पोलिसांनी उमर मतीनच्या दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन शोधण्यासाठी सिद्दीकच्या फ्लोरिडा येथील घराची झडती घेतली होती.
- हल्ल्यानंतर सिद्दीकने खुलासा केला होता, की त्याचा मुलगा गे कपलला पाहून संतप्त होत होता. त्यामुळे त्याने केलेल्या कृत्याला धार्मिकतेची जोड देऊ नये.
हल्लेखोराचे वडील सिद्दीक म्हणाले, 'दोन पुरुष किस करत असल्याचे पाहून त्याला प्रचंड राग येत होता. मियामी येथे एका गे कपलला मिठी मारताना त्याने पाहिले होते, तेव्हा उमर खूप चिडला होता. कदाचित यामुळेच त्याने नाइट क्लबमध्ये असे कृत्य केले असेल.'
- 'त्याच्या बायको आणि मुलासमोर दोन पुरुष किस करतांनी त्याने पाहिले तेव्हा तो संतप्त झाला होता.'
- दुसरीकडे एफबीआयच्या चौकशीत खुलासा झाला, की हल्ला करण्यापूर्वी मतीनने 911 या क्रमांकावर फोन करुन तो आयएसआयएसचा दहशतवादी असल्याचे सांगितले होते.

मुळचा अफगाणचा होता मतीन
- 29 वर्षांचा उमर मतीन मुळचा अफगाणिस्तानातील होता. त्याला अमेरिकेचा नागरिक देखील म्हटले जात आहे.
- आई-वडिलांसह तो 1986 मध्ये अमेरिकेत आला होता आणि फ्लोरिडामध्ये ते स्थायिक झाले होते.
- आयएसआयएसचे वृत्त ज्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केले जातात, त्यावर उमर आयएसआयएसचा समर्थक असल्याचे म्हटले आहे.
- मात्र पोलिसांनी त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसा थाटात केला वॉशिंग्टन डीसीचा दौरा
बातम्या आणखी आहेत...