आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशक्त मुलांना मारणा-या पुत्रास वडिलांनी बॉक्सरकडून चोपले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - वाट चुकलेल्या मुलाला सरळ करण्यासाठी अनेकदा कडक पावले उचलावी लागतात. यूट्यूबवर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून असेच उदाहरण समोर आले. व्हिडिओमध्ये भांडखोर, बिघडलेल्या मुलाला वठणीवर आणण्यासाठी वडील त्याला कसे बॉक्सिंग रिंगमध्ये उतरवतात हे दाखवण्यात आले आहे. संबंधित मुलगा लहान मुलांना विनाकारण ठोसे मारून मारहाण करत होता. त्यानंतर तो मारहाणीचा गाजावाजाही करीत असे. घरच्यांनी अनेकदा समजावल्यानंतरही त्याच्यात काहीच सुधारणा झाली नाही. काही दिवसांपूर्वी त्याने आणखी एका मुलाला मारले. वडिलांना समजल्यावर त्यांनी दादागिरीतूनच धडा शिकवण्याचे ठरवले. वडील त्याला जवळच्या बॉक्सिंग क्लबमध्ये घेऊन गेले आणि व्यावसायिक बॉक्सरविरुद्ध त्याला रिंगमध्ये उतरवले.
पहिल्यांदा त्याला वयाने मोठ्या बॉक्सरशी भिडवले. अनुभवी बॉक्सरने त्याला आरामशीर पद्धतीने ठोसे लगावले. मुलगा रिंगमध्ये पाय जमवू शकला नाही. यानंतर काही वेळात त्याच्याच वयाचा दुसरा बॉक्सर रिंगमध्ये उतरवण्यात आला. त्यानेही यथेच्छ ठोसे लगावले. दोन सामन्यांनंतर मुलाची अवस्था केविलवाणी झाली होती आणि तो एका कोप-यात जाऊन बसला. व्हिडिओमध्ये एक जण 'परत मार दबंग मुला, पुन्हा मार' असे म्हणताना दिसला. तो संबंधित मुलाचा पिता असल्याचे सांगण्यात येते. कमकुवत मुलांना शक्तिप्रदर्शन दाखवतोस, आता काय झाले?' असा सवाल त्याला विचारण्यात आला. काही लोकांना मुलांना समजावण्याची पद्धत आवडली नाही. याव्यतिरिक्त ज्यांच्याविरुद्ध तो दादागिरी करत होता त्यांची भावना कशी होत असेल याची जाणीव यातून त्याला झाली, असे काहींचे मत आहे.
छायाचित्र: चार मिनिटांचा हा व्हिडिओ साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.