आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांचा दावा, वडिलांचे प्रेम लाभल्यास मुलींची गणितात प्रगती!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्टिन (टेक्सास) - मुलांनानकोसे वाटणारे गृहपाठ पालकांसाठीही कटकटीचे ठरतात. मुलांनी गृहपाठ पूर्ण करावेत, अशी शाळांची अपेक्षा असते. त्यात आई-वडिलांनी मदत केल्यास पाल्याचा अभ्यास व्यवस्थित होतो. मात्र, बहुतांश वडील मुलांच्या गृहपाठात मदत करण्यात कुचराई करतात. मात्र, एका संशोधनानुसार वडिलांनी मुलांच्या गृहपाठात लक्ष घातल्यास मुले जास्त प्रज्ञावान बनत असल्याचे समोर आले आहे. पित्याच्या प्रेमामुळे मुलगी गणितात तर मुलगा भाषाकौशल्य कला विषयात जास्त प्रगती साधतो, असा दावा युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या संशोधकांनी केला आहे.

अभ्यासानुसार, हा सकारात्मक परिणाम मुलगा मुलीवर वेगवेगळ्या पद्धतीने होतो. मुलांना गृहपाठात मदत करणारे कमी शिकलेले पुरुष इंग्रजीची कमी समज असणाऱ्या पुरुषांनाही ही बाब लागू होते. गृहपाठात मदत केल्यामुळे मुलीचा आशावाद बळावतो. आत्मविश्वास बळकट होतो. याचा परिणाम तिच्या शैक्षणिक क्षमतांवरही होतो. हा आत्मविश्वास गणितात चांगले गुण प्राप्त करण्यासाठी कामी येतो. वडिलांच्या मदतीमुळे किशोरवयीन मुलांचा आत्मविश्वास वाढतो. यातून इंग्रजी कला विषयावर चांगली पकड बसते. टेक्सास विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक मेरी-एन्नी सुईजो म्हणतात, काउन्सेलर्स शिक्षणतज्ज्ञांनी वडिलांनी मुलांच्या गृहपाठात सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन द्यावे. भावनात्मकदृष्ट्या ही बाब त्यांच्या हिताचीच आहे. कमी शिकलेल्या वडिलांनीही मुलांच्या गृहपाठात मदत केली पाहिजे. जे वडील मुलांच्या गृहपाठात मदत करत नाहीत, त्यांच्या मुलांचे भाषाकौशल्य विकसित होत नाही. याशिवाय मोठे झाल्यावर ते वडिलांशी मोकळेपणाने संवाद साधू शकत नाहीत. वडिलांनी मुलांमध्ये आत्मविश्वास जागृत केल्यास त्यांच्या करिअरवर, भविष्यावर सकारात्मक परिणाम होतो. “सेक्स रोल्स’ मासिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. संशोधकांनी सहावीच्या वर्गातील मुलांवर हा अभ्यास केला.

अन्य संशोधन : लठ्ठ महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी प्राधान्य
अन्य संशोधनानुसार, सडपातळ लोकांना नोकरीमध्ये जास्त प्राधान्य दिले जाते. विशेषकरून लठ्ठ महिलांना मुलाखतीवेळी महत्त्व दिले जात नाही. हा अभ्यास बॉडी मास इंडेक्सच्या आधारे केला आहे. यामध्ये अतिरिक्त वजनाच्या महिलांना पुरुषांच्या तुलनेत नोकरीत कमी प्राधान्य दिले जाते.
दिव्य मराठी विशेष
बातम्या आणखी आहेत...