आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्या जावयाच्या मागेही एफबीआय चौकशीचा फेरा, निवडणुकीत हस्‍तक्षेप प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रशियन हस्तक्षेप प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई तथा वरिष्ठ सल्लागार जेअर्ड कश्नेर यांची एफबीआयमार्फत चौकशी केली जाणार आहे, असा दावा अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी केला आहे.  
 
अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत कश्नेर हे तपासाच्या केंद्रस्थानी आहे किंवा नाहीत, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने यासंबंधी वृत्त दिले होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इटली दाैऱ्यावर असून त्यांच्यासमवेत कश्नेरदेखील आहेत. कश्नेर यांची सरकारमधील अनेक महत्त्वाच्या घडामोडींत भूमिका राहणार आहे. वरिष्ठ सल्लागार असलेले कश्नेर ट्रम्प यांच्या सूचनेवरून डिसेंबरमध्ये महत्त्वाच्या बैठकांना हजेरी लावणार आहेत. मॉस्कोतील बँकर, अमेरिकेचे रशियातील राजदूत यांच्याशीदेखील चर्चा करणार आहेत.

कश्नेर यांचे राजकीय वजन वाढत असतानाच ते चौकशीच्या फेऱ्यात आल्याचे वृत्त आले आहे. दरम्यान, ट्रम्प यांची मुलगी इव्हांकाने कश्नेरशी विवाह केलेला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला होता. त्यामुळेच ट्रम्प यांचा विजय झाल्याचा आरोप आहे. त्याचा तपास करण्याची मागणी होत आहे.
बातम्या आणखी आहेत...