आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घृणास्पद हिंसेमुळे अमेरिकेत भीती; यहुदी केंद्र, स्मशान आणि शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात भारतीय, यहुदी, मुस्लिम आणि इतर बाहेरच्या लोकांविरुद्ध झालेल्या हिंसक घटनांनी या समुदायांना चिंतीत केले आहे. या साऱ्या घटना दुसऱ्या समुदायाविरुद्ध घृणेच्या लाटेचे संकेत देत  आहेत. २२ फेब्रुवारीला केन्सॉसमध्ये दोन भारतीयांना गोळ्या घालणारी व्यक्ती जोरात ओरडली होती, ‘माझ्या देशातून चालते व्हा.’
 
२७ फेब्रुवारीला जेव्हा अमेरिकास्थित २१ यहुदी सामुदायिक केंद्रांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली तेव्हा रॉकविलेस्थित केंद्राच्या अधिकाऱ्यांनी लगेच सूचना दिली आणि पळण्याचे मार्ग शोधून काढले. यहुदी केंद्रांसाठी राष्ट्रीय मंत्रालयाने आपल्या सर्व केंद्रांना सतर्क केले आहे. रॉकविले केंद्राला यावेळी धमकी मिळाली नव्हती. मात्र जानेवारीत बॉम्बच्या अफवेने अधिकाऱ्यांना पावले उचलण्यासाठी बाध्य केले होते. केंद्रात अनेक विभाग बंद करून बचावाचे प्रशिक्षण देण्यात आले. रॉकविले सेंटरचे सीईओ मायकल फिनस्टीन यांनी सांगितले, ‘आम्हाला अशा पाच धमक्या मिळाल्या आहेत.’ जानेवारीनंतर ३० राज्यात ७३ यहुदी केंद्र आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. 
 
फिलाडेल्फिया आणि मिसौरीत यहुदी स्मशानातील दगडांना हानी पोहोचवण्यात आली. फ्लोरिडा आणि टेक्सॉसमध्ये मशिदींना आग लावण्यात आली. या घटनांनी चिंता वाढवली आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर यहुदी विरोधी आणि इतर हिंसेला प्रोत्साहन मिळाले आहे. न्यूयॉर्क विद्यापीठातील यहुदी अध्यापन करणारे प्राध्यापक हासिया डायनर म्हणतात, ‘जेव्हा आपण कोण कुठला आहे, कोण खरा आहे, कोण धोकादायक आहे या गोष्टींवर सार्वजनिक चर्चा करतो तेव्हा यहुदी विरोधी भावना भडकतात.’
 
ट्रम्प यांनी २८ फेब्रुवारीला अमेरिकी काँग्रेसमधील आपल्या भाषणात या भावनांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, केन्सॉस हल्ला आणि धमक्यांमुळे हे सिद्ध होते की, आपण एक देश म्हणून तिरस्कार आणि वाईटाविरुद्ध एकजूट आहोत. त्यादिवशी राष्ट्रपती अॅटर्नी जनरलच्या बैठकीत म्हणाले होते, ‘बॉम्बच्या धमक्या राजकीय हत्यार असू शकतात.’
 
बातम्या आणखी आहेत...