आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच अाेपन : अॅना, राॅजर फेडरर विजयी, एकतारिना मकाराेवाचा तिसऱ्या फेरीत विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - जगातील माजी नंबर वन अॅना इव्हानाेविक, राॅजर फेडरर, भारताचा लिएंडर पेस अाणि डॅनियल नेस्टरने फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेत शानदार विजयाची नाेंद केली. सर्बियाच्या इव्हानाेविकने महिला एकेरीच्या चाैथ्या फेरीत धडक मारली. दुसरीकडे पेस-डॅनियलने पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

माजी चॅम्पियन अॅना इव्हानाेविकने तिसऱ्या फेरीत क्राेएशियाच्या डाेना वेकिसचा पराभव केला. तिने ६-०, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने चाैथ्या फेरीचा प्रवेश निश्चित केला. माजी नंबर वन इव्हानाेविकने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये सहज विजय मिळवला. यासह तिने लढतीत अाघाडी घेतली अाणि दुसरा सेटही जिंकला.

सातव्या मानांकित अॅना इव्हानाेविकने २००८ मध्ये फ्रेंच अाेपनचा किताब पटकावला हाेता. अाता चमत्कारिक खेळी करून पुन्हा एकदा या स्पर्धेचे जेतेपद जिंकण्याचा तिचा प्रयत्न असेल.

रिचर्डचा राेमहर्षक विजय
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत रिचर्ड गास्केटने राेमहर्षक विजय मिळवला. त्याने सामन्यात कार्लाेस बेरालाेकवर मात केली. त्याने ३-६, ६-३, ६-१, ४-६, ६-१ अशा फरकाने सामना अापल्या नावे केला. यासाठी त्याला कार्लाेसने पाच सेटपर्यंत झुंजवले. त्याने दाेन सेट जिंकून िरचर्डवर पराभवाचे सावट निर्माण केले हाेते.
फेडररची दामिरवर मात
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत स्वीसकिंग राॅजर फेडररने बाजी मारली. त्याने रंगतदार सामन्यात बाेन्सियाच्या दामिर डझुम्हुरचा पराभव केला. त्याने ६-४, ६-३, ६-२ अशा फरकाने सामना अापल्या नावे केला. यासह त्याला स्पर्धेतील अापले अाव्हान कायम ठेवता अाले. तसेच पराभवाने दामिर स्पर्धेतून बाहेर पडला.

लिएंडर पेस, सानिया मिर्झा विजयी
भारताचा लिएंडर पेसने डॅनियल नेस्टरसाेबत तिसऱ्या फेरीत धडक मारली. या जाेडीने पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत बेगेमन्न अाणि क्नाेवालचा ७-६, ६-३ ने पराभव केला. तसेच जगातील नंबर वन सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीसने ६५ मिनिटांत विजय मिळवला. या अव्वल मानांकित जोडीने स्टेफनी फोर्ट‌्झ व अमादिन हेन्सवर ६-३, ६-४ ने मात केली आिण तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

मकाराेवासमाेर अॅना
तिसऱ्या फेरीत नवव्या मानांकित एकतारिना मकाराेवाने एकतर्फी विजय मिळवला. तिने एलेना वेस्लिनाचा ६-२, ६-४ ने पराभव केला. अाता तिच्यासमाेर अॅना इव्हानोविकचे तगडे अाव्हान असेल.

सफाराेवाची अागेकूच
चेक गणराज्यच्या लुसी सफाराेवाने महिला एकेरीच्या चाैथ्या फेरीत प्रवेश केला. तिने तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या सबिना लिसिकीवर मात केली. तिने ६-३, ७-६ ने एकतर्फी विजयाची नाेंद केली.
बातम्या आणखी आहेत...