आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना टॉर्चर करण्यात मज्जा वाटायची, महिला दहशतवाद्याचा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमधून आपल्या 2 मैत्रीणींसोबत सीरियाला पसार झालेली अमीरा... - Divya Marathi
ब्रिटनमधून आपल्या 2 मैत्रीणींसोबत सीरियाला पसार झालेली अमीरा...
इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना आयएस (इस्लामिक स्टेट)च्या विळख्यातून स्वतःला मुक्त करून आलेल्या माजी महिला दहशतवाद्याने या संघटनेबद्दल काही खुलासे केले आहेत. तिने सांगितल्याप्रमाणे, आयएसचे दहशतवादी महिलांना यातना देऊन असुरी आनंद लुटत होते. हे खुलासे करणारी तरुणी एकेकाळी सीरियातील आयएसची राजधानी राहिलेल्या रक्का येथे महिला दहशतवादी ब्रिगेडची सदस्य होती. महिलांना टॉर्चर करण्याच्या बाबतीत ब्रिटनच्या फीमेल टेररिस्ट सर्वात पुढे असायच्या असे तिने सांगितले.
 

महिलांना अशा यातना
- 25 वर्षीय हाजेराने 2014 मध्ये ब्रिटनमधून पळ काढून आयएसच्या अल-खानसा बिग्रेडचे सदस्यत्व स्वीकारले होते. या ब्रिगेडला त्याला आयएसचे महिला पोलिस सुद्धा म्हटले जात होते. 
- ही टीम महिलांना यातना देण्यासाठी सर्वात पुढे होती. महिलांना टॉर्चर करण्यासाठी बिटर नावाच्या एका उपकरणाचा वापर केला जात होता. या उपकरणाने महिलांना प्रसव वेदनेपक्षा जास्त वेदना होतात असा दावा तिने केला. 
- हा बिटर टूल केवळ ब्रिटिश महिलाच आपल्या महिला बंदींवर वापरत होत्या. अल-खानसा ब्रिगेडच्या सीनिअर सदस्यांचे हे आवडते हत्यार होते. 
- हाजेर अल-खानसा बिग्रेडच्या ब्रिटिश महिला दहशतवादी शमीमा बेगम, अमीरा अबेस, कदिजा सुल्ताना आणि सैली जोन्स यांच्यासोबत राहत होती. 
- तिने सांगितल्याप्रमाणे, ती आपले काम एन्जॉय करत होती. तिला महिलांना टर्चर करण्यात मज्जा वाटत होती. ते सुद्धा पीडितांच्या पती किंवा त्यांच्या वडिलांसमोर...
 

पायलटच्या शिरच्छेदाची साक्षीदार
- सीरियन वॉर न्यूजवर काम करणाऱ्या 'रक्का इज बीइंग स्लॉटर्ड साइलेंटली' चे राइटर अहमद इब्राहिम यांच्याशी संवाद साधताना तिने ही माहिती दिली. 
- आयएसमध्ये महिलांना लढणे आणि पुढे जाण्याची कथित संधी दिली जात होती. त्यामुळेच आपण या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची कबुली तिने दिली. 
- हेजरने सांगितल्याप्रमाणे, सीरियात जॉर्डन हवाई दलाच्या वैमानिकाला टॉर्चर करताना आणि त्याचा शिरच्छेद होताना ती त्याच ठिकाणी उपस्थित होती. 2014 मध्ये एका विमान अपघातानंतर आयएसने त्याला पकडले होते. 
- सद्यस्थितीला इराकमध्ये 90 टक्के तर सीरियात 85 टक्के आयएसचा नायनाट झाला आहे. 
 

पुढील स्लाइड्समध्ये पाहा, अल-खानसा ब्रिगेडच्या महिला सदस्य...
बातम्या आणखी आहेत...