आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियात महिला पोलिसांची सौंदर्य स्पर्धा, सेल्फी इंस्टाग्रामवर करावा लागतो पोस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - विविध देशांमध्ये दरवर्षी पोलिसांचा शौर्य दिन साजरा केला जातो. पोलिसांनी वर्षभरात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचे या दिवशी पुरस्कार आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले जाते. मात्र, रशियात हा दिवस साजरा करण्याची पद्धत काही औरच आहे. येथे पोलिस डे निमित्त ब्युटी कॉम्पेटिशन आयोजित केले जाते. यात समस्त रशियातून येणाऱ्या सुंदर महिला पोलिसांपैकी काहींचा सन्मान केल्या जातो. विशेष म्हणजे, यात महिला पोलिसांना आप-आपले फोटोज इस्टाग्रामवर पोस्ट करावे लागतात. यानंतर साऱ्या फोटोजमधून मोजक्या अधिकाऱ्यांना निवडून स्पर्धेसाठी निवडले जाते. 
 
सौंदर्यासह ताकद दाखवणे आवश्यक...
> या स्पर्धेचे आयोजन पोलिस अधिकाऱ्यांच्या एका पॅनलकडून केले जाते. यात महिला अधिकारी त्यांच्या सौंदर्यासह त्यांच्या धाडस आणि ताकदीवर देखील निवडल्या जातात. 
> स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला आपल्या युनिफॉर्मध्ये एक फोटो इस्टाग्रामवर अपलोड करावा लागतो. यानंतर काही मोजक्या फोटोजची स्पर्धेसाठी निवड केली जाते. 
> गतवर्षी या स्पर्धेत डारिया प्लेटनेव्हा नामक अधिकाऱ्याने बाजी मारली होती. दोन लेकरांची आई असलेल्या डारियाला सिंगिंग आणि डान्सची आवड आहे. तिने ज्युरीला आपल्या डान्सने प्रभावित केले होते.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, या स्पर्धेसाठी इंस्टाग्रामवर आलेले महिला पोलिसांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...