आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरेबियात पहिल्यांदा \'महिलाराज\'; मक्का येथून आला पहिला निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध- सौदी अरेबियाच्या इतिहारात पहिल्यांदा 'महिलाराज' पाहायला मिळाले आहे. महिलांनी निवडणूक लढवली व जिंकूनही दाखवली. पहिला निकाल मुस्लिमांचे सर्वात पवित्र स्थान मक्का येथून आला आहे. मक्काचे महापौर ओसामा अल बार यांनी सांगितले की, मदरकाह येथे सलमा बिंत हिजब अल-ओतीबी यांनी विजय मिळवला आहे. या विजयासोबत सलमा देशाच्या पहिल्या 'इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्ह' बनल्या आहे.

सौदी अरेबियात नगर परिषद निवडणुकीत आतापर्यंत 20 महिला विजयी ठरल्या आहेत. या निवडणुकीची जगभरात चर्चा सुरु झा ली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांनी या निवडणुकीत मतदान केले तसेच निवडणुकीत सहभागीही झाल्या.

येथून जिंकल्या महिला...
- सौदी अरेबियातील दुसरे मोठे शहर जेद्दा येथून महिला उमेदवार लामा अल-सुलेमान यांनी विजय पटकावला आहे.
- उत्तर भागातील अल जॉफमध्ये हनूफ बिंत मुफरेह बिन अयाद अल हाजिमी यांनी विजश्री खेचून आणली आहे. 13 विजयी उमेदवारांमध्ये त्या एकट्या महिला आहेत.
- उत्तर पश्चिमच्या तबुकमध्ये मोना अल-एमेरी व फधीला अल-अत्तावी विजयी ठरल्या.
- मतमोजणी सुरु आहे. आज (सोमवार) संपूर्ण निकाल समोर येण्याची शक्यता आहे.
- परंपरावादी देश सौदी अरेबियात पहिलांदा महिलांना मतदान करण्याचा व निवडणूक लढण्याचा अधिकार मिळाला.

लवकरच उघडेल पहिले सिनेमागृह...
- सौदी अरेबियात लवकरच पहिले सिनेमागृह सुरु होणार आहे. निवडणुकीनंतर अरब सिनेमा समितीने ही घोषणा केली आहे.
- राजधानी रियादमध्ये पहिले सिनेमागृह सुरु होणार आहे. एमओयूवर स्वाक्षरी झाली आहे.
- देशात सिनेमागृह व्हावे यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन सुरु आहे.
महिलांना होती बंदी...
- महिलांना मतदान करण्याचा व निवडणूक लढवण्याचा अधिकार नव्हता. तसेच वाहन चालवण्यास बंदी होती.
- हिजाब व बुरका परिधान करणे अनिवार्य होते. सार्वजनिक ठिकाणी शीर व पाय दिसता कामा नये.
- पुरुषांसोबत सार्वजनिक ठिकाणी संवाद साधण्यास बंदी
- पुरुष व महिलांची कॉलेज तसेच शासकिय कार्यालयातून बाहेर पडण्याची वेळ वेगवेगळी

फॅक्ट फाइल...
देशाच्या विविध भागांत महिला निवडून आल्या हे विशेष. या वेळच्या निवडणुकीत 2100 जागांसाठी हजार उमेदवार होते. त्यापैकी 979 महिला उमेदवार होत्या. सौदीत फक्त नगर परिषदेसाठीच मतदान होते. इतर ठिकाणी सरकार नियुक्ती करते. 2005 आणि 2011 मध्ये झालेल्या निवडणुका फक्त पुरुषांसाठीच खुल्या होत्या.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, विजयी महिलांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...