आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाला मटण टाकण्यासाठी गेली होती तरुणी, अचानक घडले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - रशियाच्या राजधानीत एका प्राणी संग्रहालयात वाघाने महिला कर्मचाऱ्यावर हल्ला केला. ती महिला कर्मचारी वाघाला त्याचे खुराक देऊन परत येत होती. याचवेळी वाघाने तिच्याकडे धाव अचानक तिला जखडले. यानंतर महिलेला फरपटत आपल्या गुहेपर्यंत घेऊन गेला. कसेबसे तिचे जीव वाचले असून गंभीर अवस्थेत ती रुगणालयात उपचार घेत आहे. 
 
> कलिंनिग्राड प्राणी संग्रहालयात टायफून नावाचा एक हिंस्र वाघ आहे. याच वाघाने तरुणीवर हल्ला केला. हल्ला एवढा जबरदस्त होता की वाघाच्या पिंजऱ्यात रक्ताचा सळा पडला होता. 
> वाघ पाहण्यासाठी आलेले पर्यटक वरून हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते. तर काहींनी तेथेच पडलेले खडे, खुर्च्या आणि मिळेल ते वाघावर फेकले. आपल्यावर हल्ला होत असल्याचे पाहता वाघाने तरुणीला सोडले आणि गुहेच्या दिशेने पसार झाला. 
> समोर आलेल्या हल्ल्याच्या फोटोजमधून स्पष्ट होत आहे, की वाघाचा हल्ला किती जबरदस्त होता. त्याने तरुणीला पकडताच आपल्या धारदार नखांनी तिला खुरचटणे सुरू केले होते. 
> ती जीवंत तर वाचली, पण या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, तिचा जीव वाचला पण बरे होण्यासाठी आणि जखमा भरण्यासाठी खूप वेळ जाणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हल्ला झालेल्या घटनास्थळाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...