आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fidal Castro Still Active, Many Days After Appear Public

फिडल कॅस्ट्रो अजूनही सक्रिय, ब-याच दिवसांनंतर लोकांना दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवाना - क्युबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो ब-याच दिवसांनंतर त्यांच्या हवाना येथील घराबाहेर काही तज्ञांशी चर्चा करताना दिसले. सरकारी दूरचित्रवाणीवर यासंबंधी वृत्तही प्रसिद्ध करण्यात आले.
गेल्या शुक्रवारी अन्न मंत्रालयाच्या काही तज्ञ अधिका-यांशी ते चर्चा करत असल्याचे दाखवण्यात आले. विशेष म्हणजे ८८ वर्षीय कॅस्ट्रो या बैठकीच्या वेळी थकलेले वाटत नाहीत. ते अधिक सतर्क असल्याचे यात दिसून आले.

या अधिका-यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेले कॅस्ट्रो चार तास त्यांच्यासोबत होते. कॅस्ट्रो यांनी देशातील कुपोषणाची समस्या तसेच कार्बन उत्सर्जनासारख्या संवेदनशील विषयांवर या वेळी भाष्य केले. देशाच्या सीमेवर सतत युद्धजन्य स्थिती असल्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केल्याचे सरकारी माध्यमांनी म्हटले आहे.

सध्या वृद्धापकाळामुळे कॅस्ट्रो फारसे लोकांत मिसळत नाहीत. डाव्या विचारणीचे कट्टर समर्थक असलेल्या या देशातील नागरिकांचे कॅस्ट्रो हे एक दैवतच आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत देशाचे नेतृत्व करताना कॅस्ट्रो यांनी या देशाची आिर्थक स्थिती सुधारलीच शिवाय अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राने सतत दबाव टाकूनही कधी अमेरिकेला भीक घातली नाही. उलट चाळीस वर्षे अमेरिकेला अगदी सडेतोड उत्तरच दिले.

यापूर्वी कॅस्ट्रो गेल्या २१ मे रोजी दूरचित्रवाणीवर दिसले होते. सर्बियाचे राष्ट्रपती टॉमीस्लॉव निकाेलिक यांच्याशी आपल्या निवासस्थानी चर्चा करताना त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. यानंतर शुक्रवारी ते प्रथमच जनतेसमोर आले.