आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिडेल निधनानंतर अमेरिकेत जल्लोष, त्यांची बहिण म्हणाली- त्या आयलँडवर पाय ठेवणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी - क्यूबाचे माजी राष्ट्रपती आणि क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनानंतर अमेरिकेतली निर्वासित क्यूबन नागरिक आनंदोत्सव साजरा करत आहेत. दरम्यान, फिडेल यांची बहिण जुआनिता कॅस्ट्रो यांनी भावाच्या अंत्यसंस्कारासाठी जाणार नसल्याचे म्हटले आहे. आता त्या आयलँडवर कधीही पाय ठेवायचा नाही, असा त्या म्हणाल्या.
क्यूबाला जाण्याचे काही प्लॅनिंग नाही
- जुआनिता म्हणाल्या, 'अशी अफवा पसरवली जात आहे, की मी अंत्यसंस्काराला जाणार आहे. मात्र मी स्पष्ट करते की मी त्या आयलँडवर पाय देखिल ठेवणार नाही. तसे करण्याची माझी कोणतीही इच्छा नाही.'
- 'कोणाच्याही मृत्यूने मला आनंद होत नाही. ना ही माझ्या कुटुंबातील एखाद्याच्या निधनाने मी आनंदी आहे. फिडेलली बहिण या नात्याने मी एवढे म्हणू शकते की ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचे आणि माझे रक्त एकच होते.'
- जुआनिता यांचा जन्म १९३३ मध्ये झाला. फिडेल यांना सार्वजनिक क्रिटीसाइज करणाऱ्या त्या पहिल्या होत्या.
- १९६४ पासून त्या मियामी येथे राहात आहेत. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या मदतीने त्यांनी फिडेलला हटवण्याचा प्रयत्न केला होता.
मियामीमध्ये आनंदोत्सव
- फिडेल यांच्या निधनानंतर अमेरिकी-क्यूबन नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अमेरिकेत जवळपास २० लाख क्यूबन राहातात. त्यातील ७० टक्के एकट्या फ्लोरिडामध्ये राहातात.
- येथील नागरिकांनी क्यूबा लायबर (स्वंतत्र क्यूबा)ची नारेबाजी केली.
- फिडेल यांच्या निधनाच्या वृत्तानंतर या लोकांनी रस्त्यावर येऊन नाचत आनंद साजरा केला. रस्त्यावरुन वेगाने गाड्या पळवत, हॉर्न वाजवत धुमाकूळ घातला.
- २० वर्षांपूर्वी क्यूबामधून पलायन केलेल्या ६७ वर्षांचे शिक्षक पाब्लो अरेन्सिबिया यांनी म्हटले, 'जर कोणी कोणाच्या मृत्यूनंतर आनंदोत्सव साजरा करीत असेल तर हे दुःखद आहे. तसा व्यक्ती पुन्हा होऊ शकत नाही.'
बातम्या आणखी आहेत...