आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालमिरामध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना पळवले, रशिया-सिरिया सैन्याचे 64 हवाई हल्ले, 300 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमास्कस / मॉस्को : सिरियातील जागतिक वारसा स्थळ पालमिरावर वर्चस्व मिळवण्यासाठी दहशतवाद्यांनी रविवारी पुन्हा प्रयत्न केला. परंतु रशिया व सिरियाच्या लष्कराने तो हाणून पाडला. कब्जा करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांवर ६४ हवाई हल्ले करण्यात आले. त्यात ३०० दहशतवादी ठार झाले.

पालमिरावर दहशतवाद्यांनी मे २०१५ मध्ये वर्चस्व मिळवले होते. दहशतवाद्यांनी ऐतिहासिक वारसा असलेल्या पालमिरा शहराचे वैभव नष्ट करण्याचा प्रयत्न केला. रशिया व सिरियाच्या सैन्याने या वर्षी मार्चमध्ये शहराची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका केली होती. रविवारी अतिरेकी पुन्हा काही तासांसाठी शहरात घुसले होते. परंतु रशिया व सिरियाच्या हवाई दलांनी त्यांना पळवून लावले.दहशतवादी पश्चिमेकडील प्रदेशातील रुग्णालयापर्यंत पोहचले होते.

पाच जणांचा शिरच्छेद
इस्लामिक स्टेटने हाेम्स प्रांतात पाच जणांचा शिरच्छेद केल्याची अमानुष घटना समोर आली आहे. ठार करण्यात आलेले तरुण होते. हेरगिरी केल्याचा संशय आल्यावरून या तरुणांना मृत्युदंड देण्यात आला, असे सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सने म्हटले आहे. संस्थेने त्याबाबतचा एक व्हिडिआेदेखील जारी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...