आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन कर्जबुडव्यांना आश्रय देण्याएवढा उदार: जेटली, फरार विजय मल्ल्याच्या प्रकरणात अर्थमंत्र्यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनमधील लोकशाही खूप उदार आहे. त्यामुळेच कर्जबुडव्यांनादेखील ब्रिटनमध्ये आश्रय मिळू शकतो, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. अनेक प्रकरणात भारताला हवा असलेला व फरार विजय मल्ल्या प्रकरणात जेटली यांचे हे विधान महत्त्वाचे ठरते.  
 
कर्ज बुडवण्याची समस्या हे कोणत्याही देशासाठी मोठी समस्या ठरते. म्हणूनच कर्जदारांनी कायद्याचे उल्लंघन करू नये, असे भारताला वाटते. परंतु अनेकांना बँकांकडून कर्ज घेतल्यानंतर ते परत केले नाही तरी चालते. मग खुशाल लंडनमध्ये येऊन राहिले तरी चालते. कारण इंग्लंडची लोकशाही पुरेशी उदार आहे. ती कर्जदारांनाही राहण्याची मुभा देते. , अशी खंत जेटली यांनी व्यक्त केली. ‘ट्रान्सफॉर्मिंग इंडिया : व्हिजन फॉर द नेक्स्ट डिकेड ’ या विषयावर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स साउथ एशिया सेंटरमध्ये आयोजित व्याख्यानात ते शनिवारी बोलत होते.  

प्रत्यार्पणाची याच  महिन्यात विनंती  
माल्ल्याचे प्रत्यार्पण करण्यात यावे, अशी विनंती याच महिन्यात भारताने ब्रिटनकडे केली होती. दोन्ही देशांत १९९३ नुसार करार झाला आहे. करारानंतर आतापर्यंत एकच प्रत्यार्पण झाले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...