आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलिफॉर्नियात 60 हजार एकरात आगीचे तांडव, हजारो लोकांचा जीव धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉश्गिंटन - अमेरिकेच्या कॅलिफॉर्निया राज्यातील जंगलात वणवा पेटला आहे. आगीने रौद्ररुप धारण केले असून 13 हजार लोकांना वाचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 60 हजार एकरात पसरलेली आग आटोक्यात आणण्यासाठी 9000 फायरफायटर्स मेहनत घेत आहेत. त्याशिवाय पाण्याचे टँकर असलेले 19 हेलिकॉप्टर आणि चार विमाने देखील आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या माध्यमांनी या आगीला रॉकी फायर नाव दिले आहे. अधिकार्‍यांनी सांगितले, की आमच्या आपेक्षेपेक्षा अधिक वेगाने आग पसरत चालली आहे. हवेचा वेग जास्त असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण होऊन बसले आहे. सोमवारी आग सॅन फ्रान्सिस्कोच्या उत्तरेपर्यंत पोहोचली.

सॅन फ्रॅन्सिस्कोपासून 110 किलोमीटर अंतरावरील लोवर लेक टाऊनमध्ये आठ दिवसांपूर्वी आग भडकली. बुधवारी लागलेल्या या आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही. बीबीसीच्या लॉस अँजलिस येथील पत्रकाराने सांगितले, की आठवड्यापूर्वी जंगलात वणवा पेटला. आताची येथील परिस्थिती अतिशय विदारक आहे. येथील 24 घरे आगीच्या भक्षस्थानी पडली आहे.एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की आतापर्यंत एवढी भयानक आग पाहिली नव्हती.
हवा देखील वेगाने वाहात असल्यामुळे आगीचे लोळ निघत असून धूर 300 फूटांपर्यंत उंच उठत आहेत. आतापर्यंत 6000 संपत्तींचे नुकसान झाले आहे. अशीही चर्चा आहे, की पश्चिमी अमेरिकेत चार वर्षांपासून दुष्काळ आहे. यामुळे कॅलिफॉर्नियामध्ये उष्णता वाढली आहे. येथे वारंवार वीजा कोसळतात आणि सोसाट्याच्या वार्‍यामुळे जंगलामध्ये वणवा पेटतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आगीचे तांडव
बातम्या आणखी आहेत...