आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकागो एअरपोर्टवर विमानाचे टायर फुटले, 170 प्रवासी थोडक्यात बचावले, 20 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकागो - येथील ओहारे इंटरनॅशनल एअरपोर्टवर अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाचे टायर फुटल्याने विमानाच्या एका इंजिनमध्ये आग लागली. एअरपोर्ट अथॉरिटीजनुसार हा अपघात विमानाने टेक ऑफ करण्यापूर्वी घडला. त्यानंतर लगेचच प्रवाशांना इमर्जन्सी गेटमधून उतरवण्यात आले. या अपघातात 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

विमानात होते 170 प्रवासी
- भारतीय प्रमाण वेळेनुसार शनिवारी पहाटे 4 वाजता हा अपघात घडला. हे विमान अमेरिकेहून मियामीला जात होते. यात 161 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्स होते.
- फेडरल एव्हीएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या स्पोक्सपर्सन एलिजाबेथ कोरी यांच्या मते, शिकागोच्या एबीजी न्यूज स्टेशनने प्रसिद्ध केलेल्या फुटेजमध्ये विमानाला लागलेल्या आगीचे लोट पाहायला मिळत आहेत.
- फायर डिपार्टमेंटनुसार 20 जणआंना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. बहुतांश लोकांना गोंधळामुळे पळताना पायाला मार लागला.

इंजिनात बिघाड झाल्यामुळे अपघात : अमेरिकन एअरलाइन्स
- फेडरल एव्हीएशन अॅडमिनिस्ट्रेटर (एफएए) ने टायर ब्लास्ट होणे हे अपघाताचे कारण सांगितले आहे.
- अमेरिकन एअरलाइन्सने म्हटले आहे की, अपघात हा इंजिनात बिघाड झाल्याने झाला.
- शिकागो फायर डिपार्टमेंटचे ऑफिसर टिमोथी सॅम्पी यांनी सांगितले की, त्यांनी विमानाच्या एका इंजिनाला आग लागल्याचे पाहिले.
पुढे पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...