आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉलमध्ये अंदाधूंद फायरिंग; 4 ठार, हिस्पॅनिक समुदायाच्या संंशयीताचा शोध सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- बर्लिंग्टन भागातील कास्केड मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोराने अंदाधूंंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचा तीन महिलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. मॉल रिकामा करण्यात आला असून हल्लेेखोराचा शोध घेतला जात आहे.

हिस्पॅनिक समुदायाच्या संशयीताने हा गोळीबार केल्याच्या संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोराने ग्रे कपडे परिणान केले आहे.

पोलिस काय म्हणतात...?
- सार्जेंट मार्क फ्रांसिस यांनी दिलेली माहिती अशी की, ग्रे कपडे परिधान केलेेल्या हिस्पॅॅनिक समुदायच्या एका व्यक्तीचा शोध घेेत आहे. त्याला मॉलकडे जाताना पाहिले होते. त्याने हा गोळीबार केल्याचा संंशय आहे.
- मॉलमधील लोकांंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
- हल्लेेखोर किती होते, याबाबत माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही.
- कास्केड मॉल सिएटल पासून 105 किलोमीटर अंंतरावर आहे.
कोण आहेत हिस्पॅनिक?
- स्पेन किंवा स्पेनिश बोलणार्‍या देशांशी संबंंधीत असणार्‍या लोकांंना 'हिस्पॅनिक' असे संंबोधले जाते.
- हे लोक सेंट्रल अथवा साउथ अमेरिकेत राहातात.
बातम्या आणखी आहेत...