आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाच्या पहिल्या महिला नेव्ही कॅप्टनला ‘आंतरराष्ट्रीय शौर्य’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारताच्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन राधिका मेनन यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (आयएमओ) शौर्यपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवले आहे. गेल्या वर्षी खवळलेल्या बंगालच्या उपसागरात बुडणाऱ्या ‘दुर्गाम्मा’ बोटीतील सात मच्छीमारांना त्यांनी वाचवले होते. अडचणीत सापडेल्यांना मदतीचा हात देणे हे नाविकांचे कर्तव्यच असते, ते मी बजावले, असे मेनन म्हणाल्या. जून २०१५ मध्ये बंगालच्या उपसागरात ‘संपूर्ण स्वराज्य’ जहाजाने बचाव अभियान राबवले. त्याचे नेतृत्व मेनन यांनी केले होते.
बातम्या आणखी आहेत...