आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकी देश लेसोथोच्‍या फर्स्ट लेडी बनण्याच्या 2 दिवस आधी खून, राजकीय अस्थैर्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मासेरू - आफ्रिकी देश लेसोथोचे नवनिर्वाचित पंतप्रधान थॉमस थाबाने हे  शुक्रवारी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. याच्या केवळ दोन दिवस आधी त्यांची पहिली पत्नी लिपोलेला थाबा यांची कोणी तरी गोळी घालून हत्या केली. या घटनेने संपूर्ण देश खिन्न आहे. थॉमस सध्या आपल्या तिसऱ्या पत्नीसोबत राहतात. लिपोलेला यांनी उच्च न्यायालयाकडून हा  आदेश प्राप्त केला. त्यांना फर्स्ट लेडीच्या सर्व सुविधा मिळणार होत्या. तिसऱ्या पत्नीला त्या सुविधा न देण्याचेही या आदेशात म्हटले होते.
 
थॉमस (७८) आणि लिपोलेला (५८) २०१२ पासून विभक्त राहतात. दोघांनी न्यायालयात घटस्फोटासाठी खटला दाखल केला होता. मात्र, अद्यापही त्यांना घटस्फोट मिळू शकला नाही. गेल्या आठवड्यात लिपोलेलो यांच्या घराबाहेर त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता. पती थॉमस यांना त्यांनी फर्स्ट लेडी होणे मंजूर नव्हते. लिपोलेलो यांनी आपल्या पतीला विरोध केला. त्यांनी ते पद मिळवले. राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षाची पत्नीच फर्स्ट लेडी होण्याचा सर्वत्र रिवाज आहे. मात्र, लेसोथोमध्ये घटनात्मक राजेशाही असल्याने किंग लेत्सीची तृतीय पत्नी अन्ना मोत्सोएनेंग महाराणी आहेत.  

राजकीय अस्थैर्याचा प्रयत्न
थॉमस थाबाने २०१४ मध्ये स्वत:चा जीव वाचवण्यासाठी शेजारी देश दक्षिण आफ्रिकेत पलायन केले होते. ते आपल्या सहकाऱ्यांसह याच वर्षी स्वदेशी परतले आहेत. मार्चमध्ये पंतप्रधान पाकलिथी मोसिली यांच्याविरुद्ध संसदेत अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर ३ जून रोजी निवडणुका झाल्या. थाबा यांनी संसदेच्या १२० जागांपैकी ४८ जागांवर स्थान मिळवले. बहुमतासाठी युती केली. मोसिली त्यांचे राज्य उलथवू शकतात. थाबाने २०१२ ते २०१५ दरम्यान पंतप्रधान होते. मात्र, सत्ता गेल्यानंतर जिवाच्या जोखमीमुळे त्यांनी पलायन केले होते.
 
बातम्या आणखी आहेत...