आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • First Person Accounts Of Saudi Arab Grand Mosque Crane Crash

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर मक्का मशिदीत हजारोंच्या संख्येने मृत्यूमुखी पडले असते नागरिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुर्घटनेचा व्हिडिओ पाहाण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा...
दुबई- सौदी अरबमधील पवित्र शहर मक्कातील 'अल हरम' या मुख्य मशिदीवर क्रेन कोसळून 107 जणांचा मृत्यू झाला असून 238 जखमी झाले आहेत. जखमींमध्ये नऊ भारतीयांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री आलेल्या प्रचंड वादळामुळे ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना तासभरानंतर झाली असती तर हजारोंच्या संख्येत लोक मृत्यूमुखी पडले असते, असे सूत्रांनी सांगितले आहे.

अधिकार्‍यांनी सांगितले की, हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर मशिदीच्या विस्ताराचे काम काम सुरू आहे. ही दुर्घटना जर तासभरानंतर झाली असती तर हजारों नागरिकांचा मृत्यू झाला असता, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

अल जजीराचे हवामान विभागाचे एक्सपर्ट एंगविन सांगितले की, मक्कामध्ये अधून मधून वादळाचा तडाखा बसत असतो. जेद्दाचे सौदी गॅझेटचे संपादकीय विभागाचे प्रभारी खालिद अल मीना यांनी सांगितले की, ही दुर्घटना तासभरानंतर झाली असती तर हजारो लोक मृत्यूमुखी पडले असते. कार सायंकाळची नमाज अदा करण्‍यासाठी हजारों लोक मशिदीत उपस्थित राहाणार होते. सुदैवाने मोठी हानी टळली आहे.

काय म्हणतात प्रत्यक्षदर्शी...
>30 वर्षीय याहया अल हाशमीने सांगितले की, ' आम्ही हात-पाय धुवून मशिदीत मगरिबची नमाज अदा करण्याची तयारी करत होतो. तितक्यात मोठे धुळीचे वादळ आले. मुसळधार पाऊसही सुरु झाला होता.आजुबाजुला सुरु असलेल्या कन्स्ट्रक्शन साइट्सचे बोर्ड्स व पत्रे उडाले व काही कळण्याच्या आतच मशिदीच्या छतावर भली मोठी क्रेन कोसळली. त्याखाली शेकडो लोक दाबले गेले. त्यानंतर जो ना तो मशिदीबाहेर पळते सुटला.

>अल जजीराचे पत्रकार हसन पटेल यांनी सां‍गितले की, मशिदीच्या तिसर्‍या मजल्यावर क्रेन कोसळली आहे. ही दुर्घटना स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सायंकाळी पाच वाजून 35 मिनिटाला झाली. त्यानंतर 45 मिनिटांनी नमाज अदा केली जाणार होती.

>एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, दुर्घटनेनंतर चौहूबाजुंनी कानावर किंकाळ्या ऐकायला मिळत होत्या. लोक सैरावैरा पळत होते. मदत मागत होते आणि क्षणात सर्वत्र स्मशान शांतता पसरली.

यापूर्वीही झाल्या होत्या मोठ्या दुर्घटना...
>2006 मध्ये मक्का हज यात्रेकरूंसाठी बनवण्यात आलेल्या पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. त्यात 300 जणांना मृत्यू झाला होता.

>2004 मध्ये झालेल्या एका दुर्घटनेत 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

>1990 मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 1400 लोकांचा मृत्यू झाला होता.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, दुर्घटनेची भीषणता दर्शवणारे फोटोज...