आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Picture Of Jihadi John As An Adult Comes In Britain Media

ISISच्या \'जिहादी जॉन\'ची जवानीतील छायाचित्रे आलीसमोर; कॅमेरुन म्हणाले, जॉनला संपवणारच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जगासाठी धोकादायक बनलेली दहशतवादी संघटना ISIS चा बुरखाधारी खूनी 'जिहादी जॉन'चे खरे नाव सर्व जगासमोर आले आहे. शुक्रवारी इमवाजीचे लहान पणाचे छायाचित्रेसमोर आल्यानंतर शनिवारी(ता.28) त्याच्या तरुणपणाचे छायाचित्रे प्रसिध्‍द झाली आहेत. ब्रिटिश माध्‍यमांत जी नवी छायाचित्रे समारे आली आहेत, त्यात जिहादी जॉन बेसबॉल टोपी घातलेला दिसत आहे.
ब्रिटनची गुप्तहेर संस्‍था एमआय5 च्या नजर असूनही लंडनहून मोहम्मद इमवाजी सीरियात पळून गेला. तोच हा 'जिहादी जॉन'. वेस्टमिन्स्टर विद्यापीठात विद्यार्थी असतानाची इमवाजीचे ही छायाचित्रे आहे. तिकडे ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन म्हणतात, की जिहादी जॉनसारख्‍या दहशतवाद्याचा खात्म केला जाईलच. त्याच्यासारख्‍या लोकांचा शोध घेण्‍यासाठी पोलिस, संरक्षण संस्था आणि याच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारची मदत करण्‍यास सरकार तयार असल्याचे कॅमेरुन यांनी स्पष्‍ट केले.
वेस्टमिन्स्टर विद्यापीठात तीन वर्ष अध्‍ययन
इमवाजीने 2006 ते 2009 या तीन वेस्टमिन्स्टर विद्यापीठात शिक्षण घेतले. त्याने इन्फॉर्मेशन सिस्टिम विथ बिझनेस मॅनेजमेंटसाठी प्रवेश घेतला होता. इमवाजीचा शैक्षणिक कामगिरी समाधानकारक होते. त्याच्या तरुणपणाचे पहिले छायाचित्र स्काय न्यूजने प्रसिध्‍द केले होते.

शाळेच्या वार्षिक पुस्तकात फुटबॉलपटू बनण्‍याची नोंद
लंडनमध्‍ये राहणारा मोहम्मद इमवाजी प्राथमिक शाळेच्या वार्षिक पुस्तकात आपण फुटबॉलपटू होऊ अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याला प्रिमियर लीगमध्‍ये मॅनचेस्टर यूनायटेडसाठी खेळायचे होते. लहानपणी शांत स्वभावाचा हा मुलगा पुढे इस्लामच्या नावावर निष्‍पाप लोकांची हत्या करिल असे कोणालाही वाटले नव्हते. कुवेतमध्‍ये जन्म झालेल्या इमवाजी आपल्या कुटूंबासह वयाच्या सहाव्या वर्षी ब्रिटनमध्‍ये आले होते.
तो आपल्या आई-वडीलांबरोबर मशिदीत जात होता आणि त्याला अरबी भाषा बोलायचा. परंतु तो वेशभूषा पाश्‍चात्त्य पध्‍दतीने करत होता.

पुढील स्लाइडवर पाहा'जिहादी जॉन'ची लहानपणाची छायाचित्रे आणि हस्ताक्षर वही...