आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्वर्ड विद्यापीठामध्ये पहिला रॅप थिसिस, आईच्या कल्पनेतून साकारला अल्बम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅसाच्युसेट्स - हार्वर्डमधून पदवी शिक्षण घेणाऱ्या इंग्रजी विभागाच्या एका विद्यार्थ्याने आपल्या अंतिम प्रबंधाच्या रूपात हिप-हॉप अल्बम तयार केला आहे. २० वर्षीय ओबेसी शॉने हा म्युझिक अल्बम तयार केला आहे. त्याने १० गाण्यांचा अल्बमचे नाव लिमिनल माइन्ड्स ठेवले आहे.
 
अमेरिकेतील वांशिक मुद्द्यावर लिहिलेल्या आपल्या कवितांतून हा अल्बम साकारला. अॅटलांटाचा रहिवासी शॉ म्हणाला, आफ्रिका अमेरिकेस भले स्वातंत्र्य मिळाले असेल, मात्र वांशिक भेदभाव आणि गुलामी अद्यापही आहे. या अल्बममधील प्रत्येक गाणे गुलामगिरीतील स्वातंत्र्याचा शोध आहे. याच्या निर्मितीसाठी त्याला एक वर्ष लागले.

कवितालेखन आणि रॅप संगीत आपला छंद आहे. यामुळेच प्रबंध तयार करताना मजा आली,असे शॉने सांगितले. ऑनर्ससोबत पदवी मिळवायची असल्यास हार्वर्डमध्ये शिक्षण घेणारे सीनियर विद्यार्थी प्रबंध लिहितात. ओबेसी शॉला या प्रोजेक्टसाठी ए मायनस ग्रेड मिळाला. याचा अर्थ तो ऑनर्ससोबत पदवी शिक्षण घेईल. त्याला इंग्रजी शाखेत दुसरा क्रमांक मिळाला आहे. पदवीनंतर शॉ सिएटल येथे एक वर्ष गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजीनिअरिंगमध्ये इंटर्नशिप करेल. मात्र, तरीही आपण रॅप लिहिणे आणि गाणे सोडणार नाही. शॉला रॅप हिप-हॉप अल्बम बनवण्याची कल्पना त्याच्या आईने दिली.
 
तिने ओबेसीला सांगितले की, रॅप म्युझिक लिहीत असशील तर कॅम्पसमध्ये परफॉर्मही का करत नाही? कविता प्रोजेक्टच्या रुपात ठेवण्यापेक्षा त्या अल्बममध्ये गुंफाव्यात, असा सल्ला आईने दिला. सांस्कृतिक महत्त्व समजण्यासाठी गेल्या वर्षी २ अल्बम हार्वर्डच्या ग्रंथालयात समाविष्ट केले आहेत.

वर्णद्वेषावरील हिंसाचारावर अल्बम मोफत शेअर करणार
शॉने आपला अल्बम मित्रांसमवेत सामान्य वाद्यांच्या मदतीने ध्वनिमुद्रित केला आहे. यामुळे याच्या संगीताचा दर्जा साधारण आहे. असे असतानाही हजारो रसिकांनी अल्बम ऑनलाइन पाहिला आहे. संगीताचा दर्जा सुधारावा व त्याचा चांगल्या प्रकारे वापर व्हावा यासाठी शॉ लवकरच व्यावसायिक स्तरावर ध्वनिमुद्रण करणार आहे. असे असले तरी अल्बमची विक्री करण्याऐवजी मोफत शेअर करणार असल्याचे शॉ म्हणाला.
बातम्या आणखी आहेत...