आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO:रोबोटने पहिल्यांदा केली सिंहाची सर्जरी, किडनीतून काढला ट्यूमर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिलान- इटलीतील मिलानमध्ये लोदी वेटनरी हॉस्पिटलमध्ये एका सिंहावर सर्जरी करण्‍यात आली. लियोनार्डो असे ‍सिंहाचे नाव असून तो 8 वर्षाचा आहे. सिंहाच्या किडनीवर रोबोटिक सर्जरी करून त्यातून ट्यूमर बाहेर काढण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. जगात एखाद्या प्राण्यावर रोबोटिक सर्जरी झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

'टेलेएप एएलएफ-एक्स' सर्जिकल रोबोटच्या मदतीने सिंहावर यशस्वी सर्जरी करण्‍यात आली. सर्जरीनंतर तीन तासांत सिंह चालू फिरु लागल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. सिंह आता पूर्णपणे बरा झाला असून लांघे मुराजानो सफारी पार्कमध्ये संचार करत आहे.

मिळालेली माहिती अशी की, लियोनार्डोला (सिंह) अंतःस्त्राव (इंडोस्रिन डिसऑर्डर) झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले होते. सिटी स्कॅन केल्यानंतर त्याच्या किडनीत ट्युमर असल्याचे डॉक्टरांनी निदान केले. एखादा सिंहाच्या किडनीत ट्यूमर झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
लोदी हॉस्पिटलचे एनस्थीसिया ऑपरेटिव्ह यूनिटने ट्यूमर बाहेर काढण्यासाठी पारंपरिक ओपन सर्जरी करण्‍याचा निर्णय घेतला. परंतु यात सिंहाच्या जीवाला धोका असल्याचे मतही काही डॉक्टरांनी व्यक्त केले. त्यामुळे ऐनवेळी डॉक्टरांनी आपला निर्णय बदलून सिंहावर रोबोटिक सर्जरी करण्‍याचा निर्णय घेतला. प्राण्यांवरही रोबोटिक सर्जरी केली जाऊ शकते, हे या घटनेवरून सिद्ध झाले आहे.
रोबोटिक सर्जरी
'टेलेएप एएलएफ-एक्स रोबोट' हे एक यंत्र आहे. रोबोटिक हात रिमोटने नियंत्रण ठेवण्यात येते. एका खास सॉफ्टवेअरच्या मदतीने रुग्न प्राण्याच्या शरीरावर छोटीशी चिरफाड करून सर्जरी केली जाते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सिंहावर करण्यात आलेल्या रोबोटिक सर्जरीचा व्हिडिओ आणि फोटो...