आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने दिला चार मिनिटांत पाच मुलींना जन्म,1969 नंतर पहिलीच घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: डॅनियल बेस्बी आणि पति अॅडम आपल्या चिमुकल्यासह
ह्युस्‍टन - अमेरिकेच्या टेक्सासमध्‍ये एका महिलेने एकापाठोपाठ पाच मुलींना जन्म दिला आहे. आणि ती सर्व ठणठणीत आहे.जगात प्रथमच अशी घटना घडली आहे.जुळे, तिळे किंवा चार मुलांचा जन्म सहज शक्य आहे.टेक्सासमधील हॉस्पिटलच्या म‍ाहितीनुसार 1969 नंतर प्रथमच असे प्रकरणसमोर आले आहे.ह्यूस्टनच्या डॅनियल बेस्बीने टेक्सासच्या विमेन हॉस्पिटलमध्‍ये चार मिनिटात पाच मुलींना जन्म दिला.त्यांच्या जन्मास 28आठवडे आणि दोन दिवस असा वेळ लागला आहे.पती अॅडम या पाच चिमुकल्यांच्या जन्माने खूप खूश आहे.बेस्बीही खूप खूश असून तिने देवाचे आभार मानले आहे.

यूट्यूबवर अपलोड केला पाच कन्यारत्नांचा व्हिडिओ
अॅडमने यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.त्यात ते पाच कन्यारत्नांचे वैशिष्‍ट्ये सांगतात.डॅनियलने गर्भधारणेसाठी इंट्रायूटेराइन इनसेमिनेशन तंत्रज्ञानाची मदत घेतली होती.डॅनियल व्यवसायाने सैनिक आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची प्रसूतीसाठी मदत
डॉ.रैटर यांना प्रसूतीसाठी डझनभर लोकांनी मदत केली.तेव्हा पाच मुलींचा जन्म सुरक्षित होऊ शकले.या नवजात मुलींच्या देखभाल करण्‍यासाठी सात जणांचे तज्ज्ञ गट काम करत आहे.

यामुळे दुर्मिळ
यापूर्वी 1980मध्‍ये अमेरिकेत पाच मुलींना एकापाठोपाठ जन्म दिला होता.यात एकीचा मृत्यू झाला होता.यामुळे हे प्रकरण दुर्मिळ झाले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा,टेक्सास येथील या पाच कन्यारत्नांचे फोटोज