वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्टाफमध्ये प्रथमच एका ट्रान्सजेंडरचा समावेश करण्यात आला आहे. व्हाइट हाऊसने मंगळवारी ट्रांसजेंडर अॅक्टिव्हिस्ट राफी फ्रीडम-गुरस्पॅन यांची न्युक्ती केली. त्या सध्या प्रेसिडेंटसाठी काम करणाऱ्या रिक्रुटमेंट टीममध्ये काम करत आहे. फ्रीडम व्हाइट हाऊस पर्सनल ऑफिसमध्ये रिक्रुटमेंट डायरेक्टर म्हणून ती काम करणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या प्रसासनाने सर्वांना समान दर्जा देण्याच्या दृष्टीने चालवल्या जाणाऱ्या कँपेन समर्थकांना महत्त्व दिले आहे.
का झाली निवड...
ओबामांचे सिनिअर अॅडव्हायजर वालेरेई जारेट म्हणाले की, राफी फ्रीडमने तिच्या कामामध्ये अशा प्रकारे नेतृत्व केले की त्यातून एका प्रशासकीय चॅम्पियनचे अनेक गुण दिसले. अमेरिकेमध्ये राहणाऱ्या ट्रान्सजेंडरसाठी त्यांनी मोठा लढा उभारला होता. विशेषतः ट्रान्सजेंडरचे रंग-रुप आणि गरिबीच्या विरोधातील त्यांच्या प्रयत्नांतून त्यांची क्षमता दिसून येते.
ट्रान्सजेंडरच्या अधिकारांना मिळेल मजबुती
नॅशनल सेंटर फॉर ट्रान्सजेंडर इक्वॅलिटी (NCTE) च्या मारा केसिलिंग म्हणाल्या, व्हाइट हाऊसमध्ये एका ट्रान्सजेंडरला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. रंग किंवा कोणताही भेदभाव न करता हे होत आहे. त्यामुळे ट्रान्सजेंडरच्या अधिकारांच्या लढाईला आधार मिळेल. तिने तुरुंगामध्ये ट्रान्सजेंडरची स्थिती सुधारणे, पोलिसिंग आणि ट्रान्सजेंडर महिलांविरोधात होणाऱ्या हिंसेबाबत काम केले आहे.
ओबामांची भूमिका...
अनेक वर्ष मौन बाळगल्यानंतर ओबामांनी स्वतः गे मॅरेजला पाठिंबा दर्शवला होता. गे मॅरेजच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचे कौतुकही त्यांनी केले होते. ओबामा प्रशासनाने यापूर्वीच अमेरिकेमद्ये गे, लेस्बियन आणि ट्रान्सजेंडर यांच्या अधिकारांबाबत पाठिंबा दर्शवला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा. ओबामा प्रशासनात नोकरी मिळालेल्या पहिल्या ट्रान्सजेंडरचे फोटोज...