आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Main Points Of PM Modis Speech At Sap Center In California

मोदींच्या भाषणातील 5 मुद्दे; \'दामाद\'चाही केला उल्लेख, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन जोस (कॅलिफोर्निया) - अमेरिकेच्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी सिलिकॉन व्हॅलीतील सॅप सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वंशाच्या नवागरिकांच्या उपस्थित भाषण केले. त्यांनी 16 महिन्यांच्या सारकारच्या कामगिरीची माहिती देताना सांगितले की, रोज दोन तास बोललो तरी सांगायला 15 दिवस लागतील एवढा विकास झाला आहे. त्यामुळे आज फक्त ट्रेलर दाखवून जात आहे. त्याचबरोबर त्यांनी भ्रष्टाचाराचा उल्लेख करताना 'दामाद'चाही उल्लेख केला. त्याद्वारे त्यांनी नाव न घेता काँग्रेसवर हल्ला चढवला. चला पाहुयात त्यांच्या भाषणातील पाच महत्त्वाच्या बाबी...

1. मोदी म्हणाले, आज केवळ ट्रेलर दाखवून जातोय
आम्ही एवढा विकास केला आहे की रोज दोन दोन तास बोललो तरी 15 दिवस लागतील. त्यामुळे आज केवळ ट्रेलर दाखवून जात आहे.

2. 'दामाद' चा उल्लेख करून काँग्रेसवर हल्ला
काही वेळातच नेत्यांवर आरोप होत असतात. मुलाने 250 कोटी कमावले, मुलीने 500 कोटी कमावले, जावयाने 1000 कोटी कमावले. मावस भाऊ, चुलत भाऊ यांनी कोट्यवधी कमावले, असे आरोप होतात. यामुळे भ्रष्टाचार वाढला, राग वाढला. पण आज मी तुमच्यामध्ये उभा आहे. माझ्यावर कधी आरोप लागला. आम्ही जगतोही देशासाठी आणि प्राणही देऊ तो देशासाठीच. मोदीने काय केले आणि मोदी काय करत आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्हाला आठवत असेल मी म्हटलो होतो मेहनत करण्याच मागेपुढे पाहणाप नाही. प्रत्येक क्षणाचा मी सदुपयोग करेल. आज 16 महीन्यांनंतर मला तुमचे सर्टिफिकेट हवे आहे. त्यांनी उपस्थितांना काही प्रश्न केले. मी आश्वासन पाळले, परिश्रम केले की नाही. देशासाठी झगडतोय की नाही, तुम्ही दिलेली जबाबदारी योग्यपणे सांभाळतोय

3. दहशतवादावर म्हणाले, यूएनने ठरवावी दहशतवादाची व्याख्या
8.44AM: गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम सुरू आहे. दहशतवाद हा दहशतवाद असतो. आम्ही जगाला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आमच्यावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत. दहशतवाद जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकतो. दहशतवादाचे चित्र स्पष्ट असावे ही जबाबदारी संयुक्त राष्ट्रांची आहे. त्यांनी दहशतवादाची व्याख्या ठरवावी. मी गांधी आणि बुद्धांच्या भूमीतून आलो आहे. मी ठामपणे यूएनमध्ये म्हणणे मांडले आहे. यूएनला अद्याप दहशतवाद समजलेला नाही. असे झाल्यास दहशतवाद संपायला किती वर्षे लागतील. मी जगातील सर्व देशांना दहशतवाद संपवण्यासाठी एकत्र येण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

4. पहिल्या प्रयत्नात मंगळावर पोहोचलो, मीही पहिल्या प्रयत्नात यशस्वी झालो
उपनिषदापासून भारताच्या उपग्रहाची चर्चा सुरू झाली आहे. संपूर्ण विश्वास भारत पहिला असा देश आहे जो पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचला. मीही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालो. कारण ही संकल्पाची शक्ती आहे. आज अगदी मच्छीमारांनाही या स्पेस टेक्नॉलॉजीचा फायदा होतो.

5. ब्रिक्समध्ये I शक्तीनिशी उभा
काही काळापूर्वी ब्रिक्स संकल्पना आली होती. त्यांचे म्हणणे होते की, आगामी काळात वेगाने विकसित होतील असे पाच देश आहेत. ब्राजील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ अफ्रीका. त्यात भारताचा समावेश नव्हता. गेल्या काही वर्षांत ब्रिक्समध्ये भारताचा I जगाला कमीच दिसत होता. पण आज आम्ही तेवढ्याच ताकदीने उभे आहोत. 15 महिन्यांमध्ये विकासाकडे वेगाने वाटचाल सुरू केल्याने भारत ब्रिक्समध्ये शक्तीशाली बनून समोर आला असल्याचे समोर आले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, कार्यक्रमाचे PHOTO आणि VIDEO
Video पाहण्यासाठी क्लिक करा दुसऱ्या स्लाइडवर...