आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लोरिडा एअरपोर्टवर फायरिंग, 5 ठार, हल्लेखोराला अटक; हल्लेखोर आहे माजी सैनिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लोरिडा - अमेरिकेच्या फ्लोरिडाच्या फोर्ट लॉडरडेल इंटरनॅशनल एअरपोर्टवर नुकताच गोळीबार करण्यात आला. लॉ एन्फोर्समेंट डिपार्टमेंटच्या मते या गोळीबाराच्या घटनेमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 8 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, मीडिया रिपोर्ट्सनुसार एस्टबेन सँटियागो अशी हल्लेखोराची ओळख पटली आहे. त्यांच्या लगेजमध्येच फायरिंगचे सामान ठेवलेले होते, असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे मिलिट्रीचे आयडी कार्ड होते. एस्टबेन मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सांगितले जात आहे. त्याने आर्मीत नोकरी केलेली आहे. 

एअरपोर्ट केले रिकामे 
- एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांच्या मते ही घटना टर्मिनल 2 च्या बॅगेज क्लेम एरियामध्ये घडली. त्यानंतर पोलिसांनी एअरपोर्ट रिकामे केले. 
- अमेरिकेच्या फेडरल एव्हीएशनच्या अधिकाऱ्यांनी या एअरपोर्टवर विमान वाहतूक सध्या स्थगित केली आहे. 
- गोळीबाराच्या मागे सँटियागोचा उद्देश काय होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. 
- व्हाइट हाऊसच्या माजी प्रेस सेक्रेटरी एरी फ्लीशर यांनी ट्वीट केले की, मी सध्या फोर्ट लॉडरडेल विमानतळावर आहे. येथे खूप गोळ्यांचा आवाज येत आहे. सर्व लोक धावपळ करत आहेत. 

अलास्काहून आला फ्लोरिडाला
- लॉ एन्फोर्समेंट अधिकाऱ्यांच्या मते, सेंटियागो शुक्रवारी अलास्काहून फ्लोरिडाला आला होता. 
- तो एअरपोर्टला आला त्यावेळी त्याने बॅगेज क्लेम एरियामध्ये बॅगमधून गन बाहेर काढली आणि फायरिंग सुरू केली. 
- गन लोड करण्यासाठी तो बाथरूममध्ये गेला होता, असे एका सुत्राने सांगितले. परत येताच त्याने फायरिंग सुरू केली. 

2007 मध्ये जॉइन केले नॅशनल गार्ड, 2014 मध्ये हकालपट्टी 
- सीएनएन रिपोर्टनुसार सँटियागोने 2007 मध्ये प्यूर्तो रिकोमध्ये नॅशनल गार्ड जॉइन केले होते. 
- अलास्का आर्मीच्या स्पोक्सपर्सनच्या मते, नॅशनल गार्ड जॉईन करण्यापूर्वी तो आर्मीच्या रिझर्व्ह फोर्समध्ये होता. 
- 2010 मध्ये तो 10 महिन्यांसाठी इराकला गेला होता. 2014 मध्ये त्याला खराब परफॉर्मन्समुळे काढून टाकले होते. 

आजारी असल्याचे हॉस्पिटलमध्ये होता दाखल 
- अधिकाऱ्यांच्या मते, आरोपी अनेक महिन्यांपूर्वी एफबीआयच्या ऑफिसमध्ये गेला होता. 
- त्याठिकाणी त्याने त्याला काही आवाज ऐकू येतात अशी तक्रार केली होती. 
- कोणीतरी त्याला सोबत यायला सांगत असल्याचे वाटते असे तो म्हणाला होता. 
- त्याच्या या तक्रारीनंतर त्याला मानसिक चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, हल्ल्याशी संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...