आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियात भूस्खलनामुळे २४ जणांचा मृत्यू, २६ नागरिक बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - इंडोनेशियाच्या मध्य जावा प्रांतात आलेला भीषण पूर आणि भूस्खलनामुळे २४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २६ जण बेपत्ता आहेत. या घटनेत हजारो इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती इंडोनेशियाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे प्रवक्ते सुतोपो नुगरोहो यांनी दिली आहे. ते म्हणाले की, हा प्रांत देशातील प्रचंड लोकसंख्येचा असून शनिवारी मध्यरात्री या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. लष्कर, पोलिस, खासगी संस्था तसेच स्वयंसेवकांच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध घेणे सुरू आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून प्रशासनाकडून पीडितांना तातडीने मदत पोहोचवली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...