बीजिंग- चीनच्या छाँगिंग सिटी शहरातील मेट्रोमध्ये सध्या फ्लॅश योगाची धूम पाहायला मिळू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मे महिन्यातील भेटीनंतर दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ बनत असल्याचे स्थानिक मीडियाने म्हटले आहे.
सहा तरुणांची ही संकल्पना आहे. हे तरुण मेट्रोमध्ये दाखल होताच प्रवाशांना योगाच्या विविध आसनांची माहिती देतात. त्यानुसार काही वेळातच योगावर आधारित शिस्तबद्ध हालचाली करणारे असंख्य प्रवाशी पाहायला मिळतात. चीनमध्ये योग खूप लोकप्रिय होऊ लागला आहे. म्हणूनच २१ जून रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने हजारो नागरिक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते.
काय आहे उद्देश ? : योगाला देशभरात लोकप्रियता मिळावी, लोकांमध्ये सुदृढ जीवनशैलीचा प्रचार व्हावा, या उद्देशाने सहा तरुण स्वयंप्रेरणेने हे काम करू लागले .