आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: इटलीमध्ये दोन लाख प्लास्टिक ठोकळ्यांपासून बनवला पूल \'फ्लोटिंग पायर्स\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेल्जियमचे कलावंत ख्रिस्तो यांनी इटलीमधील एका तलावात 'फ्लोटिंग पायर्स' हा पूल तयार केला असून तो शनिवारी लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. इटलीतील सुलजाना गावाजवळ आइसियो तलावामध्ये दोन लाख 20 हजार प्लास्टिकचे ठोकळे (क्यूब)वापरून हा पूल तयार करण्यात आला असून त्याची लांबी तीन किलोमीटर आहे. हा पूल लोकांना पाहता यावा म्हणून जुलैपर्यंत खुला राहणार असल्याचे ख्रिस्तो यांनी सांगितले. या पुलाच्या निर्मितीचे काम अनेक दिवसांपासून सुरू होते. उद्घाटनापूर्वी पुलाला पिवळा रंग देण्यात आला.
पाण्यावर चालण्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक लोक गर्दी करत असून ते तलावातील मोंटे आइसोला बेटापर्यंत चक्कर मारून येत आहेत. एरवी पाण्यामुळे येथे जाता येत नाही. ख्रिस्तो यांनी त्यांच्या 80 वर्षीय पत्नी जीन क्लाॅड यांच्यासाठी हा पूल अशा प्रकारे जोडण्याची कल्पना केली होती. हा सामान्यांसाठी 3 जुलैपर्यंत खुला राहणार आहे.
पुढे पाहा फ्लोटिंग पायर्सचे अप्रतिम छायाचित्रे
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)