आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेत पुरातील मृतांची संख्या 100च्‍या वर, पूरग्रस्तांना भारतीय नौदलाकडून मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो.. - Divya Marathi
फाईल फोटो..
कोलंबो - श्रीलंकेत पुरातील मृतांची संख्या १०० वर पाेहोचली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय नाैदलाची जहाजे श्रीलंकेत दाखल झाली आहेत. २००३ नंतरचे देशावरील हे सर्वात मोठे नैसर्गिक संकट मानले जाते. केलानी नदी परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे.
 
केल्लोन्नोवा, काडुवेला, वेल्लाम्पिटिया, केलानिया, बियागामा, सेडावट्टी, डाॅम्पे, हान्वेला या गावांना पुराचा तडाखा बसला आहे. १४ जिल्ह्यांतील सुमारे लाख ३८२ कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू आहे.
 
बातम्या आणखी आहेत...