आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४ वर्षीय मुलीने केला ६८ वर्षीय कोट्यधीशाशी विवाह, ३ महिन्यांनी फाेटाे पाहून तिचे आजोबा असल्याचा उलगडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लोरिडा - अमेरिकेत एका अनोख्या लग्नाचे प्रकरण समोर आले आहे. मुलीने नकळतपणे आपल्या आजोबाशीच लग्न केले. मात्र, तीन महिन्यांनंतर घरात पडलेला जुना अल्बम पाहताना ते तिला माहीत झाले. छायाचित्रात पतीसोबत तिच्या वडिलांना पाहून तिला धक्काच बसला. सध्या दोघेही खुश आहेत. आजोबा आणि नातीला आता एकमेकांपासून घटस्फोट नको आहे.

त्याचे झाले असे : फ्लोरिडातील एक २४ वर्षीय तरुणी दोन वर्षांपासून ६८ वर्षांच्या एका कोट्यधीश ज्येष्ठासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. काही महिन्यांपूर्वी दोघे विवाह- बंधनात अडकले आणि मियामीत राहू लागले. यादरम्यान एक दिवस पतीने फोटो अल्बम पाहण्याची विचारणा केली. त्याला पत्नीने होकार दिला. अल्बममध्ये पतीच्या पहिल्या पत्नीपासून जन्मलेल्या मुलांचीही छायाचित्रे होती. पतीची आणि त्यांची अनेक दिवसांपासून ताटातूट झाली होती. अल्बम चाळताना पत्नीची नजर एका छायाचित्रावर पडली. त्यात पतीसोबत असणाऱ्या व्यक्तीबाबत तिने विचारले. पतीने हा माझा मोठा मुलगा आहे, असे उत्तर देताच पत्नी अस्वस्थ झाली. दुसरे छायाचित्र पाहिल्यावर संबंधित व्यक्ती अन्य कोणी नव्हे तर तिचे वडीलच आहेत, अशी ठाम धारणा झाली. आपला भूतकाळ सांगताना पत्नी म्हणाली, “शाळेत शिकत असताना एका मुलाशी प्रेमसंबंध जुळले. वडिलांना ही बाब सांगितल्यावर त्यांनी घरातून हाकलून दिले.

तेव्हापासून मी मुलांसमवेत जॅक्सनविलेमध्ये एकटी राहू लागले. स्वत:चा आणि मुलांचा खर्च भागवण्यासाठी एका क्लबमध्ये नृत्यांगना म्हणून काम करत होते. अल्बममध्ये वडिलांचा फोटो पाहून मी खूप निराश झाले. मात्र, माझे नाते खूप बळकट असल्याची जाणीव झाली, त्यामुळे आम्ही घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतला.’ पतीच्या म्हणण्यानुसार, ‘हे माझे तिसरे लग्न आहे. २००९च्या आर्थिक मंदीमुळे माझा दुसरा घटस्फोट झाला. यानंतर मी लॉटरी खेळू लागलो. दोन वर्षांनंतर लॉटरी लागली आणि नशीब फळफळले. मी कोट्यधीश झालो. तिसऱ्या पत्नीची भेट डेटिंग वेबसाइटद्वारे झाली. वेबसाइटवर अनेक मुली दिसल्या, मात्र माझी नवी पत्नी सर्वात आकर्षक वाटली. तिचा प्रोफाइल फोटो पाहिला तेव्हा चेहरा ओळखीचा वाटला. परंतु ती माझी नात आहे हे मी ओळखू शकलो नाही. माझे दोन घटस्फोट याआधीच झाले आहेत. आता मला तिसरा घटस्फोट द्यावयाची इच्छा नाही. मी तिला २०१५ च्या नववर्षात लग्नाचा प्रस्ताव दिला, तेव्हापासून आम्ही दोघे एकत्रच राहत आहोत.’
बातम्या आणखी आहेत...