आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओरलँडोगे नाइट क्लबवर हल्ला: ओमर मतीनच्या पत्नीला होती कटाची कल्पना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- ओरलँडोगे नाइट क्लबवर हल्ला करणारा ओमर मतीन याच्या पत्नीला त्याच्या कटाची माहिती होती, त्याने शस्त्रे आणली तेव्हा ती त्याच्यासोबतच होती, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे. या कटाची माहिती दिल्याच्या आरोपावरून प्रशासन आता तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे, असेही या वृत्तात म्हटले आहे.

या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा हवाला देऊन ‘द एनबीसी न्यूज’ने म्हटले आहे की, ओमर मतीनने शस्त्रे आणली तेव्हा आपण त्याच्याबरोबर होतो तसेच त्याच्यासोबत एकदा नाइट क्लबमध्येही गेलो होतो, असे ओमरची पत्नी नूर जाही सलमान हिने एफबीआयच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या प्रकाराची माहिती दिल्याच्या आरोपावरून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा विचार प्रशासन करत अाहे, पण अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. नूर जाही प्रशासनाला तपासात मदत करत आहे.

एका अधिकाऱ्याचा हवाला देऊन दुसऱ्या वृत्तात म्हटले आहे की, कटाच्या काही प्रक्रियेत नूर जाही ही ओमरच्या सोबत होती. आता आम्ही त्याची चौकशी करत आहोत. एखाद्या व्यक्तीला संभाव्य गुन्ह्याची माहिती असेल तर तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र नूर जाहीविरुद्ध लगेच गुन्हा दाखल होईल की नाही हे आताच सांगता येणार नाही.
ओमर मतीन याने गेल्या रविवारी फ्लोरिडातील ओरलँडो येथील गे नाइट क्लबवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात ४९ जण ठार तर ५३ जण जखमी झाले होते. अमेरिकेच्या अलीकडच्या इतिहासातील हे सर्वात मोठे हत्याकांड आहे.