आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द व्हॉइस' फेम गायिका क्रिस्टिना ग्रिमीची हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी- दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम "द व्हाॅइस'मध्ये छाप सोडणारी उदयाेन्मुख गायिका क्रिस्टिना ग्रिमीची एका हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. हल्लेखोराजवळ दोन पिस्तूल आणि चाकू होता, असे पोलिसांनी सांगितले.

ऑर्लंडो पोलिस विभागाने केलेल्या टि्वटमध्ये संशयित हल्लेखोराचे नाव केविन जेम्स लोइबल असल्याचे सांगितले. २७ वर्षीय आरोपी हल्लेखोर फ्लोरिडातील सेंट पीटर्सबर्गचा रहिवासी आहे. ग्रिमीवर हल्ला करण्याच्या उद्देशानेच तो फ्लोरिडातून ऑर्लंडोला आला असल्याचा दावा पोलिसांनी केला. २२ वर्षीय ग्रिमीने शुक्रवारी रात्री "बीफोर यू एक्झिट' ग्रुपसोबत प्लाझा लाइव्ह थिएटरमध्ये कार्यक्रम केला होता अाणि ऑटोग्राफ देण्यासाठी थांबली होती. यादरम्यान हल्लेखोराने तिच्या दिशेने येत गोळ्या झाडल्या. ग्रीमीला ऑर्लंडो रिजनल मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले तेव्हा तिला मृत घोषित करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...