फुकुशिमा येथील
आपत्तीनंतर सुमारे चार वर्षांनी याठिकाणी त्याचे दुष्परिणा समोर यायला सुरुवाज झाली आहे. विशेषतः याठिकाणी नव्याने उगवणारी फळे आणि फुले यांच्या गुणसुत्रांवर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. अनेक फळांचे आकार आपोआपच बदलले आहेत. एकाच फळावरच दुसरे फळ उगवलेले पाहायला मिळत आहे, किंवा एकाच देठाला अनेक फळे आलेलीदेखिल पाहायला मिळत आहेत. तसेच फुलांवरही असे अनेक परिणाम झालेले पाहायला मिळत आहेत. अनेक फुलांचे आकारही बदलले आहेत. अनेक फुलांच्या पाकळ्यांचा आकार कमी झालेलाही पाहायला मिळाला आहे. प्राण्यांवर अद्याप त्याचा परिणाम पाहायला मिळाला नसला, तरी काही फुलपाखरांवर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे.
मार्च 2011 मध्ये फुकुशिमा येथे आलेल्या त्सुनामीमुळे अणुप्रकल्पातील सहापैकी तीन रिअॅक्टरमध्ये बिघाड झाला. त्यानंतर त्या रिअॅक्टरचे तापमान वाढले आणि ते वितळले त्यामुळे विषारी रसायने आणि वायूची गळती झाली होती. ही रसायने आणि वायू पाण्यात मिसळली गेली होती. त्यामुळे अशा प्रकारे फुलांवर आणि फळ किंवा भाज्यांवर त्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. एका वेबसाईटने नुकतेच प्रकाशित केलेले हे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत. मात्र हा परिणाम खरंच त्या अपघाताचा आहे किंवा नाही याला अद्याप शास्त्रज्ञांनी दुजोरा दिलेला नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फुले आणि फळांवर झालेले परिणाम...