आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 लाख गुलाब अन् 40 कोटींचा खर्च, या शाही लग्नाचा श्रीमंती थाट बघतच राहाल....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी नजानिन जफारियन सोबत फोलोरिन अलाजिक. - Divya Marathi
पत्नी नजानिन जफारियन सोबत फोलोरिन अलाजिक.
आंतरराष्ट्रीय डेस्क - इंग्लंडच्या ऑक्सफोर्डशायरमधील ब्लेनहेम पॅलेसमध्ये सोमवारी शाही लग्न झाले. हे लग्न नायजेरियाची तेल सम्राज्ञी आणि जगातील सर्वात श्रीमंत कृष्णवर्णीय महिला फोलोरन्शोचा मुलगा फोलोरिन अलाजिक याचे होते. तो त्याची प्रेयसी नजानिन जफारियनशी विवाह बंधनात अडकला. 
 
10 लाख गुलाबांनी सजवले गेले पॅलेस...
- या शाही विवाह सोहळ्याला माध्यमांतून खूप प्रसिद्धी दिली गेली. यात तब्बल 5 मिलियन पाउंड (40 कोटी रुपये) खर्च करण्यात आले.
- पॅलेसचा मुख्य हॉल, जेथे लग्न झाले त्याला 10 लाख गुलाबांनी सजवण्यात आले होते. तसेच 12 फूट उंचीचा केक बनवण्यात आला होता.
- एवढेच नव्हे, तर पाहुण्यांना सरप्राइज देण्यासाठी येथे प्रसिद्ध गिटारवादक रॉबिन थिक यांच्या मैफलीचे आयोजनही करण्यात आले होते.
- फोलारिनचे हे दुसरे लग्न असून त्याला आधीच्या लग्नापासून एक मुलगाही आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे काही वर्षे आधी कॅन्सरने निधन झाले होते.
 
जगातील सर्वात श्रीमंत कृष्णवर्णीय महिलेचा मुलगा...
-फोलारिन नायजेरियन ऑइल टायकून फोलोरन्शो अलाजिका यांचा मुलगा आहे.
-फोर्ब्सने 2014मध्ये प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार फोलोरन्शो 2.1 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत कृष्णवर्णीय महिला आहे.
- ऑइल बिझनेसशिवाय फोलोरन्शोचे जगातील इतर देशांतही अनेक व्यवसाय आहेत.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा फोलोरिनच्या शाही लग्नाचे हे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...