आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इसिस’च्या इफ्तार पार्टीत विषबाधा; ४५ जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इस्लामिक स्टेट (इसिस) या अत्यंत क्रूर समजल्या जाणा-या दहशतवादी संघटनेने आयोजित केलेल्या एका इफ्तार पार्टीत विषबाधा झाल्याने ४५ दहशतवादी ठार झाल्याचे इराकमधील माध्यमांनी म्हटले आहे.

इराकमधील माेसूल शहरामध्ये ‘इसिस‘ने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी १४५ दहशतवादी सायंकाळी उपस्थित होते. मात्र भोजनामधून झालेल्या विषबाधेमुळे ४५ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार सामूहिक हत्याकांडाचा प्रकार असल्याचे इसिसने म्हटले आहे. इराकमध्ये इसिस, कुर्द व सुरक्षा रक्षकांमधील चकमकी प्रचंड वाढल्या आहेत. हे तिन्ही गट परस्परांच्या विरोधात सर्वच आघाड्यांवर लढत असून बदला घेण्याच्या भावनेतून या दहशतवाद्यांचा काटा काढण्यात आला असावा, असा माध्यमांचा कयास आहे.

सन २०१४ मध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. कुर्दांनी आयोजित केलेल्या अशाच एका पार्टीत अन्नामध्ये विष मिसळून इसिसने काही बळी घेतले होते. त्या वेळीसुद्धा अनेक दहशतवादी ठार झाले होते.