आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Child Doctor Increases Brain Dead Woman Life

बाळाच्या जन्मासाठी ब्रेन डेड महिलेचे आयुष्य डॉक्टरांनी ५४ दिवस वाढवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेतील डॉक्टरांनी एका बाळाला जन्म देण्यासाठी गर्भवती ब्रेन डेड महिलेचे आयुष्य ५४ दिवसांनी वाढवले. मुलाला जन्म दिल्यानंतर त्या महिलेचे दोन दिवसांनी निधन झाले. ओहामा येथे मेथॉडिस्ट हेल्थ सिस्टिममध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
रुग्णालयाचे डॉक्टर सू कोर्थ यांनी सांगितले की, शुक्रवारी जन्मलेल्या या बाळाचे नाव अँजल असे ठेवले आहे. तिची आई २२ वर्षीय कारला पेरेज ही होती. या वर्षी ८ फेब्रुवारी रोजी नेब्रास्कामध्ये वॉटर्लू आपल्या घरात काम करत असताना पडली होती. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. तिच्या डोक्याला जबर मार लागला होता. तेव्हापासून डोकेदुखीचा त्रास वाढला होता. अधूनमधून तीव्र वेदना होत होत्या. अचानक एके िदवशी ती बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी तिच्या मेंदूत रक्तस्राव होत असल्याचे तपासण्यात आढळून आले. त्यानंतर कारलाचे ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यावेळी तिच्या पोटातील गर्भ २२ आठवड्यांचा होता. त्यामुळे गर्भपात शक्य नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी आठ आठवडे इन्क्युबेटरच्या साह्याने जिवंत ठेवले. जेणेकरून ३२ व्या आठवड्यांत बाळाचा जन्म सुलभ व्हावा.

अवयव दान केले
कारला पेरेजच्या कुटुंबीयांनी तिच्या बाळंतपणानंतर तिचे शरीर अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या शरीरातून ितघांचे प्राण वाचवता येतील. रुग्णालयाचे उपाध्यक्ष सू कोर्थ यांनी सांगितले की, पॅरेज ही एक अशी महिला होती जिने १९९९ मध्ये अशाच प्रकारे मुलाला जन्म दिला होता.

मूल राहिले नसते
२२ आठवड्यांनंतर मूल गर्भातून िजवंत बाहेर येणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही तिला २४ आठवड्यांपर्यंत कोणत्याही स्थितीत गर्भात जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे बाळ वाचू शकले. -डॉ. लोयर्न, वुमन्स हॉस्पिटल