आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांसाठी सौदीचे आपत्ती व्यवस्थापन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सौदी अरेबिया सरकारने भारतीय वंशाच्या बेरोजगारांसाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा स्थापन केली आहे. त्यामुळे हजारो भारतीयांना याचा लाभ होणार आहे. त्या अंतर्गत मोबदला न मिळालेल्या दाव्यांचा निपटारा करण्यात येणार आहे.सौदी सरकारने या प्रश्नाला मानवी पातळीवरील समस्या म्हणून हाताळण्यास सुरूवात केली आहे. स्वतंत्र यंत्रणेमुळे सौदीत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्याचा मार्गही सुकर होणार आहे. त्यासाठी तेथील सरकारने त्याची प्रक्रिया आणखी सोपी करून दिल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली.

सौदीतील अस्थिरतेच्या परिस्थितीत मायदेशी परतण्याची इच्छा बाळगणाऱ्या भारतीयांची नेमकी संख्या एवढ्या स्पष्ट होऊ शकणार नाही. परंतु यथावकाश मायदेशी परतू इच्छिणाऱ्यांसाठी सौदी सरकारने व्यवस्था केली आहे. रोजगार, स्थलांतर, प्रत्यर्पण, कामगार शिबिरातील स्थिती अशा चार प्रकारच्या समस्यांना भारतीय नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. सौदीत सुमारे ७ हजार भारतीय आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे, अशी सूचना भारताने सौदीकडे केली होती.
बातम्या आणखी आहेत...