आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानमारच्या नेत्या स्यू की प्रथमच राखीने दौऱ्यावर; हिंसाग्रस्त क्षेत्रांना देणार भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यांगून- म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांनी प्रथमच उत्तर राखीनेला भेट दिली. रोहिंग्या मुस्लिमांच्या हकालपट्टीचा मुद्दा जगभरात गाजत असतानादेखील स्यू की यांनी क्वचित यावर भूमिका मांडली होती. त्यामुळे त्यांचा हा पहिला दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्याविषयी कमालीची गुप्तता राखण्यात आली आहे.  या भागातील रोहिंग्या मुस्लिमांना सीमापार हकलण्यात म्यानमार सैन्याची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, स्यू की यांनी सैन्याच्या कारवाईवर टीका केली नाही. 

म्यानमारच्या कौन्सिलर सध्या राखीनेतील सीट्टवे येथे आहेत. त्यानंतर त्या माउगंडवा, भुथीदूआंग येथे भेट देतील. म्यानमार सरकारचे प्रवक्ते झॉ हटे यांनी ही माहिती माध्यमांना दिली. रोहिंग्यांच्या स्थलांतरावेळी हिंसेचे मुख्य केंद्र असलेल्या स्थानांना आंग सान स्यू की भेट देणार असल्याचे झॉ हटे यांनी सांगितले. मात्र, कौन्सिलरच्या दौऱ्याचा तपशील त्यांनी दिलेला नाही. 

दौऱ्याचा तपशील दिला नाही : राखीने क्षेत्रात शेकडो खेडी सैन्याच्या छळवणुकीत उध्वस्त झाली आहेत. या ठिकाणी स्टेट काैन्सिलर स्यू की भेट देतील का, याविषयी तपशील दिला गेला नाही.
 
समितीच्या कामासाठी दौरा आयोजनाची शक्यता  
 राखीनेमधील पुनर्वसन आणि रोहिंग्यांच्या परतीच्या निकषांसाठी स्पष्ट पात्रता धोरण ठरवण्यासाठी आंग सान स्यू की यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या कामासाठीदेखील त्यांच्या या भेटीचे आयोजन करण्यात आले असावे, असा अंदाज आहे. झॉ हटे यांनी बुधवारी बांगलादेश रोहिंग्यांच्या परतीच्या धोरणाला प्रतिसाद देत नसल्याचे म्हटले होते. २५ ऑगस्टनंतर बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांच्या नावाची यादी ढाका प्रशासनाने द्यावी, अशी मागणी म्यानमार सरकारने केली आहे.  
बातम्या आणखी आहेत...