आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात सर्वाधिक कमावत्या 10 पैकी 6 अभिनेत्री चाळिशीपार, फोर्ब्जच्या यादीत अॅमा अव्वल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - फोर्ब्ज मासिकाने या वर्षीच्या सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची यादी जारी केली आहे. यंदाच्या यादीतून दीपिका पदुकोन बाहेर पडली. ती गेल्यावर्षी दहाव्या क्रमांकावर होती. विशेष म्हणजे अव्वल दहा अभिनेत्रींपैकी ६ जणींनी चाळिशी आेलांडली आहे. हॉलीवूड अभिनेत्री अॅमा स्टोन १६७ कोटी रुपयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. जेनिफर अॅनिस्टन १६३ कोटी रुपयांसह दुसऱ्या, तर जेनिफर लॉरेन्स १५४ कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.  
 
फोर्ब्जनुसार, सर्व दहा अभिनेत्रींचे एकूण वार्षिक उत्पन्न १६ टक्क्यांनी घटले आहे. गेल्यावर्षी त्यांचे एकूण उत्पन्न १३१५ कोटी रुपये होते. या वेळी ते ११०६ कोटी रुपये आहे. गेल्यावर्षी यादीत स्थान मिळवणारी दीपिका पहिली भारतीय अभिनेत्री होती. बॉलीवूडशी अंतर राखल्यामुळे तिला या वेळी स्थान मिळू न शकल्याचे बोलले जात आहे. २०१७ मध्ये तिचा एकमेव हॉलीवूड चित्रपट आला. २०१६ मध्ये दीपिकाचे एकूण उत्पन्न ६४ कोटी रुपये होते.  
 
फोर्ब्ज- २०१७  यादीत क्रमांक एक पटकावणाऱ्या अॅमा स्टोनचे “ला ला लँड’ चित्रपटातील भूमिकेचे कौतुक झाले होते. तिला या चित्रपटासाठी सर्वाेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. “ला ला लँड’ने जगभरात जवळपास २८.५ अब्ज रुपयांची कमाई केली होती. अॅमाने स्त्री-पुरुष समानतेसाठी आवाज उठवला आहे. मी १५ वर्षांची असताना ऑडिशन देण्यासाठी आले होते. एकामागोमाग एक ऑडिशन देताना काय त्रास होतो हे मला माहीत असल्याचे अॅमा म्हणते.  
 
या वेळी ३ अभिनेत्रीच १२८ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकल्या  : टॉप १० अभिनेत्रींचे एकूण उत्पन्न १ जून २०१६ ते १ जून २०१७ या काळातील आहे.  नीलसन, कॉमस्कोर, बॉक्स ऑफिस मोजो, आयएमडीबीची आकडेवारी व मुलाखतीच्या आधारे फोर्ब्जने उत्पन्न निश्चित केले. या वेळी केवळ तीन अभिनेत्रीच १२८ कोटी रुपये (२० दशलक्ष डॉलर) किंवा त्यापेक्षा जास्त कमाई करू शकल्या. गतवेळच्या ४ अभिनेत्रींचे एवढेच उत्पन्न होते. या यादीत समावेश झालेल्या सहा जणींचे वय ४० पेक्षा जास्त आहे. त्यात जेनिफर अॅनिस्टन, मेलिसा मॅककॅर्थी, चार्लिज थेरन, कॅट ब्लेंचेट, ज्युलिया रॉबर्ट्स व अॅमी अॅडम्सचा समावेश आहे.
 
पुढील स्‍लाइडवर...टॉप 10 अभिनेत्री...
 
बातम्या आणखी आहेत...