आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ब्‍सच्‍या 600 \'सुपर अचिव्‍हर्स\'मध्‍ये 30 भारतीयवंशाचे, सर्व Under 30

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्‍यूयॉर्क - फोर्ब्‍ज मॅगझीनने 20 उद्योगातील 30पेक्षा कमी वय असणाऱ्या यशस्‍वी उद्योजकांची 'सुपर अचिव्‍हर्स' यादी नुकतीच जाहिर केली आहे. यामध्‍ये 30 भारतवंशीय उद्योजकांनी स्‍थान पटकाविले आहे. 'सुपर अचिव्‍हर्स' मध्‍ये आरोग्य, क्रिडा, उत्‍पादन आणि गुतंवणुुकीसारख्‍या  इतर 20 उद्योगांमध्‍ये बदल घडवून आणणाऱ्या 600 युवाउद्योजकांचा समावेश केला आहे. 
पुढे वाचा, यादीत कोणाचा समावेश आहे. 
 
- सुपर अचिव्‍हर्स यादीत 'नियोलाइट' कंपनीचे सहसंस्‍थापक विवेक कोप्‍पार्थी(27) यांचा समावेश आहे. 
- त्‍यांनी फोटोथेरेपीसाठी यंत्र ब‍नविले आहे. 
- काविळचे रुग्‍ण घरीच या यंत्राचा वापर करुन उपचार करु शकतात. 
- विवेक यांची कंपनी आता मुलांना होणाऱ्या हायपोथर्मिया रोगासाठीही असेच यंत्र बनवित आहे. 
- सामाजिक क्षेत्रामध्‍ये काम करणारे 20 वर्षाचे तेजू रविलोचन यांना यादीत 21वे स्‍थान मिळाले आहे. तेजू अनरीजबेल संस्‍थेचे सहसंस्‍थापक आहे. 
 
 वरुण यांनी हिलरी क्लिंटन यांना कॅम्‍पेनमध्‍ये उर्जा धोरणाबाबत सल्‍ला दिला आहे. 
- वरुण (27) यांना कायदा आणि धोरणे या क्षेत्रामध्‍ये स्थान मिळाले आहे. 
- वरुणने ऑक्‍सफोर्ड विद्यापिठातून पिचडी मिळवली आहे. 
- वरुण उर्जा, सुरक्षा आणि वातावरण बदलाचे एक्टिंग डायरेक्‍टर आहेत. 
- वरुणची कंपनी आंतरराष्‍ट्रीय संबंधावरील एक लिडींग थिंक टँक काऊन्सिल आहे. 
- हिलरी क्लिंटन यांच्‍या कॅम्‍पेनमध्‍ये वरुण यांच्‍या कंपनीने उर्जा धोरणावर सल्‍ला देण्‍याचे काम केले आहे.  
 
रवांडामध्‍ये ड्रोनद्वारे औषध पोहोचवण्‍याचे काम करत आहे प्रार्थना 
- विकसनशील देशातील नागरिकांना आरोग्यविषयी मदत करण्‍यासयाठी प्राथना देसाई (27) यांनी हार्वर्ड विद्यापीठातील शिक्षण सोडले. 
- प्राथना देसाई यांची हेल्‍थ केअर कंपनी जिपलाइन रवांडा या देशात ड्रोन द्वारे औषध पोहचविण्‍याचे काम करत आहे.  
- शॉन पटेल (28) हार्वर्ड मेडिकल स्‍कुलमध्‍ये ऑर्थोपेडिक सर्जरी विभागातील मुख्‍य रेजिडेंट सर्जन आहेत. 
- त्‍यांच्‍या कंपनीने ऑर्थो‍निंजा मोबाईल अॅप तयार केले आहे. या अॅपद्वारे रुग्‍णांना डॉक्‍टरांशी संवाद साधता येतो व आरोग्यासंबंधी मदत मिळवता येते.
 
भावाच्‍या आजाराने प्रेरीत होऊन तयार केले ब्रेन हॅमरेज टेस्टिंग डिवाइस 
- रोहन सुरी (17) एवेरिया हेल्‍थ सोल्‍यूशनचे संस्‍थापक आहेत. 
- त्‍यांच्‍या भावाला कोणता आजार झाला आहे, याचे निदान डॉक्‍टरांना सुरवातीला होत नव्‍हते. 
- म्‍हणून हे शोधण्‍यासाठी रोहनने ब्रेन हॅमरेज टेस्टिंग यंत्र तयार केले.   
- डोक्‍याला काही दुखापत झाली व त्‍याचा मेुंदवर परिणाम झाल्‍यास या यंत्राद्वारे त्‍याचा शोध लावला जातो. 
- साधारणत: ब्रेन हॅमरेजची तपासणी आय ट्रॅकिंग सिस्‍टीमद्वारे केली जाते. मात्र ही तपासणी प्रचंड खर्चिक असते.
- मागील सहा महिन्‍यात रोहनने 60 रुग्णांची या यंत्राद्वारे तपासणी केली आहे. 
 
शेतकऱ्यांना मदत करत आहे आदित्‍य अग्रवाल 
- आदित्‍य अग्रवाल (23) किसान नेटवर्कचे सहसंस्‍थापक आहेत. 
- त्‍यांनी छोटया शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन मार्केट प्‍लेस बनविले आहे. 
क्रिडा क्षेत्रातून अक्षय खन्‍ना यांचा समावेश करण्‍यात आला आहे. 
- अक्षय खन्‍ना (29) अमेरिकेची फुटबॉल टीम फिलाडेल्फिया सेवन सिक्‍सर्सचे उपअध्‍यक्ष (स्‍ट्रॅटेजी) आहेत. 
 
यांनाही मिळाले यादीत स्‍थान 
- अनर्घ्‍या वरधाना (28) आणि अक्षय गोयल (28) यांची वेंचर कॅपिटल या क्षेत्रासाठी निवडल झाली आहे. अनर्घ्‍याने अनेक स्‍टार्टअपमध्‍ये गुंतवणुक केली आहे.  
- अक्षय स्‍टारवुड कॅपिटलचे सर्वात युवा उपअध्‍यक्ष आहेत. त्‍यांनी 47,600कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 
- उत्‍पादन क्षेत्रासाठी 28 वर्षीय नेहा गुप्‍ता यांची निवड झाली आहे. त्‍यांनी बीट्स कंपनी अॅपलला विकण्‍यामध्‍ये मोठी भूमिका निभावली होती. 
 
पुढील स्‍लाइडवर पहा, सुपर अॅचिव्‍हर्सचे फोटोज 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...