आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Forbes नुसार या मॉडेलची वार्षिक कमाई सर्वात जास्त, वर्षाला कमवते इतके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - फोर्ब्सने जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-10 मॉडेल्सची यादी जाहीर केली आहे. यात अमेरिकेची 22 वर्षीय मॉडेल आणि रियालिटी टीव्ही सेलिब्रिटी केन्डाल जेनर पहिल्या क्रमांकावर आहे. ती प्रसिद्ध मॉडेल आणि टीव्ही सेलिब्रिटी किम कर्दाशियनची बहिण आहे. फोर्ब्सनुसार, तिने वर्षभरात 142 कोटींची कमाई केली आहे. असे करून तिने 37 वर्षीय सुपरमॉडेल जिसेल बंडचेन हिला पिछाडीवर टाकले आहे. ती गेल्या 15 वर्षांपासून फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक कमाई करणारी मॉडेल ठरत आली होती. तिची वर्षभराची कमाई 113.50 कोटी एवढी होती. 

 

Top 10 मध्ये एकही भारतीय मॉडेल नाही
> यादीत 10 मॉडेल्समध्ये एकही भारतीय नाही. केन्डाल अॅडिडास, ला पार्ला आणि एस्टे लॉडरसह असंख्य आंतरराष्ट्रीय ब्रॅन्डचा चेहरा बनली आहे. या ब्रॅन्ड्सच्या माध्यमातून तिच्या वार्षिक कमाईमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 78 कोटी रुपयांची भर पडली आहे.
> तिला सर्वात जास्त पैसा इंस्टाग्रामवरून मिळाला आहे. इंस्टाग्रामवर तिचे 8.5 कोटी फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर केलेल्या प्रत्येक पोस्टसाठी तिला 2.5 कोटी रुपये मिळतात. 
> उल्लेखनीय बाब म्हणजे, याचवर्षी आलेल्या माहितीनुसार इंडियन टीमचा कॅप्टन विराट कोहलीला एका इंस्टाग्राम पोस्टचे 3.5 कोटी रुपये मिळतात. 

 

पुढील स्लाइड्सवर, टॉप-10 मॉडेल्स आणि त्यांची कमाई कोटी रुपयांमध्ये

बातम्या आणखी आहेत...