आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोसूलमधील ४२ हजार नागरिकांचे स्थलांतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - गेल्या महिन्यात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विरोधातील लष्करी कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे ४२ हजारांवर नागरिकांना घरेदारे व मोसूल परिसरातील गावे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले आहे.
मोसूलमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबेपर्यंत सुमारे १० लाख लोकांना स्थलांतरित व्हावे लागू शकते. स्थलांतरितांची संख्या आता वाढू लागली आहे. त्यात आणखी भर पडू शकते. एका आंतरराष्ट्रीय संस्थेने हा दावा केला आहे. मोसूलमधील लष्करी कारवाईला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. निनवेह प्रांतातून सर्वाधिक स्थलांतरित होण्याचे प्रमाण आहे. या प्रांताची मोसूल राजधानी आहे. अद्यापही इराकच्या लष्करी फौजा राजधानीच्या मध्यवर्ती भागात दाखल होऊ शकलेेल्या नाहीत. त्याच भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
२०१४ मध्ये इसिसने बगदादचा उत्तर व पश्चिम प्रदेशावर कब्जा केला होता. परंतु त्यानंतर काही महिन्यांतच इराकी फौजांनी या प्रदेशावर पुन्हा नियंत्रण मिळवले आहे. जिहादी गटाकडून महत्त्वाची शहरे पुन्हा ताब्यात घेतली जात आहेत. त्याचा फटका इसिसला बसला आहे. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर जिहादींचा मोठ्या प्रमाणात सफाया झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मानवी ढालींचे मनसुबे
मोसूलवरील इराकी फौजांच्या चढाईमुळे खवळलेल्या इसिसने स्थानिकांचा वापर मानवी ढाल म्हणून स्वसुरक्षेसाठी करण्याचे मनसुबे आखले आहेत, असा दावा मोसूलमधील काही नागरिक व संयुक्त राष्ट्राकडून करण्यात आले आहे. त्यासाठी लोकांना बळजबरीने डांबण्यात येऊ लागल्याचे वृत्त आहे.
बातम्या आणखी आहेत...