आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंत्याच्या हत्येची घटना वैयक्तिक कृती: परराष्ट्र सचिव एस. जयशंकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतीय अभियंत्याच्या हत्येच्या घटनेकडे ‘वैयक्तिक कृती’ म्हणून पाहिले पाहिजे आणि अमेरिकेतील समाज या घटनेच्या विरोधात आहे, असे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. जयशंकर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी वाणिज्य सचिव रिटा टिआेटिया यांच्यासह ट्रम्प प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विविध बैठकांमधून कान्ससमधील घटनेचा उल्लेख वारंवार आला. उच्चस्तरीय बैठकांतून त्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला. 
 
सध्या घटनेचा तपास एफबीआयद्वारे केला जात आहे. एकूणच घटनेबद्दल अमेरिकेतील प्रत्येक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे, असे जयशंकर म्हणाले.  दरम्यान, प्रत्येक शोकांतिका अमेरिकेतील नागरिकांना जवळ आणणारी घटना ठरते. अशा वाईट घटनांतून आपण नव्याने उभारी घेऊन जगतो. तुम्ही कोणत्या धर्माचे-देशाचे आहात, तुमचा रंग कोणता आहे हे महत्त्वाचे नाही, अशा शब्दांत भारतीय-अमेरिकी रिपब्लिकन नेते पुनीत अहलुवालिया यांनी आपल्या भावना शोकसभेत व्यक्त केल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...