आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट मालिकेत २३ नागरिक ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार 20 पेक्षा जास्त लोक आतापर्यंत या हल्ल्यात ठार झाले आहेत. - Divya Marathi
एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार 20 पेक्षा जास्त लोक आतापर्यंत या हल्ल्यात ठार झाले आहेत.
काबूल - तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सोमवारी घडवून आणलेल्या साखळी बॉम्बस्फोटात किमान २३ जण ठार झाले. नेपाळी सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसवर निशाणा साधत केलेल्या आत्मघाती हल्ल्यात १४ जवानांचा मृत्यू झाला. अफगाण फौजांच्या मदतीसाठी तालिबानविरुद्ध हवाई हल्ले करण्याची अमेरिकेने घोषणा केल्यानंतर हे स्फोट झाले आहेत.

कॅनडाच्या दूतावासासाठी काम करणाऱ्या नेपाळी सुरक्षा रक्षकांच्या मिनीबसवर केलेल्या पहिल्या हल्ल्यात १४ जण ठार झाल्याचा दावा तालिबानने केला आहे. दक्षिण काबूलमध्ये स्थानिक राजकारण्यावर निशाणा साधत केलेल्या स्फोटात एक ठार तर पाच जखमी झाले. ईशान्येकडील बडाखशन प्रांतातील बाजारपेठेत झालेल्या स्फोटात किमान ८ ठार तर १८ जखमी झाले. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अख्तर मन्सूर पाकिस्तानमध्ये ठार झाला. त्याचा उत्तराधिकारी हैबतुल्हाह अखुंदझाद याच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात हल्ले वाढवण्यात आले. पोलिसांनुसार, जलालाबादकडे जाणाऱ्या नेपाळी सुरक्षा रक्षकांच्या बसवर एका हल्लेखोराने पहाटे ६.०० पूर्वी हल्ला केला.

यामध्ये १४ नेपाळी जवान ठार झाल्याचे अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. स्फोटात जखमी नऊपैकी पाच नेपाळी आणि चार अफगाण नागरिकांचा समावेश आहे. आजच्या हल्ल्यात आमच्या सुरक्षा संस्थेचे जवान ठार झाल्याचे टि्वट कॅनडियन दूतावासाने केले आहे.

जलालाबाद रस्त्यावरील स्फोटाच्या ठिकाणी दोन डझन रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. स्फोट एवढा मोठा होता की, आसपासच्या दुकानांच्या खिडक्यांची तावदाने तुटली. तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्हाह मुजाहिद याने सोशल मीडियावर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

निरपराध व्यक्तींविरुद्ध नृशंस गुन्हा : ओली
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी तालिबानच्या अफगाणिस्तानमधील हल्ल्याचा निषेध केला आहे. संबंधित घटना निरपराध व्यक्तींविरुद्धचा नृशंस गुन्हा असल्याचे ते म्हणाले. नेपाळी जवानांच्या मृत्यूबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले की, अफगाणिस्तानमधील आत्मघाती हल्ल्यात १४ नेपाळींचा मृत्यू झाल्याचे ऐकून धक्काच बसला. मृतांच्या नातेवाइकांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री कमल थापा यांनी तसेच देशातील विविध पक्षांच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध केला.

काबूलमधील घटनेचा तीव्र निषेध करतो : मोदी
काबूलमधील आत्मघाती हल्ल्याच्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि निरपराध नागरिकांच्या मृत्यूबद्दल अफगाणिस्तान आणि नेपाळ सरकारप्रति संवेदना व्यक्त करत असल्याचे टि्वट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अशा क्षणात आम्ही नेपाळ सरकारला आवश्यक मदत पुरवण्यासाठी पावले उचलत आहाेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, स्फोटानंतर बसची अवस्था..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...