ब्रिटन्या शाही कुटुंबामध्ये चार दिवसांपूर्वी चिमुकलीचे आगमन झाले आहे. आता ही चिमुकली 10 वर्षांनंतर कशी दिसेल याचा फोटो प्रसिद्ध फॉरेन्सिक आर्टिस्टने तयार केला आहे. अमेरिकेचा अत्यंत प्रसिद्ध फॉरेन्सिक आर्टिस्ट मुलिन्स याने नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने 10 वर्षांनंतरचा शेरलॉटचा चेहरा तयार केला आहे. इंग्लंडमध्ये शनिवारी केट मिडलटनने शेरलॉट एलिजाबेथ डायनाला जन्म दिला होता.
ग्रीन-ब्लू असतील डोळे
वॉशिंग्टनच्या फॉरेन्सिक आर्टिस्टने त्याच्या फोटोद्वारे सांगितले आहे की, शेरलॉटचे डोळे त्याची आई केट आणि वडील विल्यम यांच्या डोळ्याच्या रंगांचे मिश्रण असेल. म्हणजे मुलीचे डोळे आगामी काळात ग्रीन-ब्लू रंगाचे असतील असे त्याने म्हटले आहे. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने विल्यम प्रिन्स आणि केटच्या फोटोंचा चांगलाच अभ्यास केला आहे. तसेच त्यासाठी त्याने कॉम्प्युटर तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. त्याने प्रिंसेस शेरलॉटचे नाक मिडलटन सारखे असल्याचे म्हटले आहे. तर केस ब्राऊन आणि ओठ विल्यम सारखे असतील असे म्हटले आहे.
फॉरेन्सिक आर्टिस्टने याआधीही याआधी अनेक प्रसिद्ध कपलच्या मुलांचे भविष्यातील चेहरे तयार करून दाखवले होते. एका मॅगझिनसाठीही तो अशा प्रकारचे फोटो तयार करतो. यासाठी जे तंत्रज्ञान वापरले आहे ते पूर्णपणे साइंटिफिक असल्याचे मुलिन्सने म्हटले आहे. मात्र याबाबत सविस्तर सांगणे त्याने टाळले. प्रिन्स विल्यम आणि केट यांच्या जीन्स आणि रंगाचा अभ्यास केल्याचेही त्याने म्हटले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित PHOTO